West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका! 'या' माजी खासदारानं फक्त 9 महिन्यांत दिला पक्षाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:25 PM2022-08-13T12:25:55+5:302022-08-13T12:29:31+5:30

गेल्या डिसेंबर 2021 मध्ये वर्मा यांना टीएमसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण...

West Bengal Politics Big blow to Mamata Banerjee in West Bengal West bengal pavan varma resigns from trinamool congress party | West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका! 'या' माजी खासदारानं फक्त 9 महिन्यांत दिला पक्षाचा राजीनामा

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका! 'या' माजी खासदारानं फक्त 9 महिन्यांत दिला पक्षाचा राजीनामा

Next

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यसभा खासदार पवन के वर्मा यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC चा राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर केवळ 9 महिन्यांतच त्यांनी पक्षालाला रामराम ठोकला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते जनता दल (युनायटेड) मधून टीएमसीमध्ये दाखल झाले होते.

ट्विट करून दिला राजीनामा - 
ममता बॅनर्जी यांनी कृपया आपला पक्षाचा राजीनामा स्वीकार करावा. मला देण्यात आलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. मी नेहमीच आपल्या संपर्कात राहीन, अशी आशा आहे. आपल्याला शुभेच्छा,' अशा आशयाचे ट्वीट पवन के वर्मा यांनीकेले आहे.

पक्षात कुठलेही पद मिळाले नाही - 
गेल्या डिसेंबर 2021 मध्ये वर्मा यांना टीएमसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पदाधिकाऱ्यांची नवीन समिती स्थापन झाल्यानंतर, त्यांना कुठल्याही प्रकारचे औपचारीक पद देण्यात आले नव्हते. यासंदर्भात वर्मा यांच्यासोबत बोलण्यासाठी अनेक वेळा फोन करण्यात आला. मात्र, कसल्याही प्रकारचा रिप्लाय मिळाला नाही. तसेच, वर्मा यांनी पक्ष सोडल्यानंतर, यामुळे पक्षावर कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पक्षाचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय म्हणाले, ‘ते जेडीयूमध्ये सामील होऊन राज्यसभेत पोहोचलेले मुत्सद्दी होते. त्यांना राज्यसभेचा दुसरा कार्यकाळ मिळाला नाही. म्हणून ते पक्ष सोडून टीएमसीमध्य आले होते. करदाचित त्यांना तृणमूलकडूनही राज्यसभेची आशा असेल. मात्र, असे झाले नाही आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ’एवढेच नाही, तर कुणाचे नाव न घेता ‘स्थानिक पातळीवरून आलेले लोक पक्षाप्रती एकनिष्ठ असतात,’ असेही रॉय यांनी म्हटले आहे.
 

Web Title: West Bengal Politics Big blow to Mamata Banerjee in West Bengal West bengal pavan varma resigns from trinamool congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.