शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 20:06 IST

भाजपच्या नबान्न अभियानादरम्यान भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचा महिला पोलिसाशी झालेला संवाद तृणमूलने शेअर केला आहे.

कोलकाता: आज पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसचा संघर्ष शिगेला पोहोचला. ममता सरकारविरोधात भाजपने नबन्ना अभियान सुरू केले, यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यातच आता तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते शुभेंदू अधिकारी यांच्या एका वक्तव्याची तृणमूलकडून खिल्ली उडवली जात आहे.

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर शुभेंदू अधिकारी यांनी केलेल्या वक्तव्याची टीएमसीकडून खिल्ली उडवली जात आहे. शुभेंदू यांचा एक व्हिडिओ तृणमूलने ट्विट केला असून, व्हिडीओमध्ये शुभेंदू एका महिला पोलीस अधिकाऱ्याला "माझ्या शरीराला हात लावू नकोस, तू एक महिला आहेस आणि मी पुरुष आहे' असे सांगताना ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभेंदू अधिकारी हावडा येथील संत्रागांची येथून नबन्नाच्या दिशेने जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना घेराव घालून पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी त्यांचा पोलिसांशी वाद झाला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी शुभेंदू यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला हात नको लावू म्हटले. यावरुन आता त्यांना ट्रोल केले जात आहे.

शुभेंदू अधिकारींची पोलिसांवर टीका

मंगळवारी अटक करताना कोलकाता पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे महिला पोलिसांचा वापर केला, त्यावर शुभेंदू अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालबाजारमधील पोलिस कोठडीतून हुगळीचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून त्यांनी हे लाइव्ह केले. यावेळी त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा