शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

ममतांना मोठा झटका! 'नारदा'प्रकरणी TMCच्या मंत्र्यांसह चार नेत्यांचा जामीन रद्द, तृणमूलचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:03 IST

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात टीएमसी नेते फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, माजी टीएमसी नेते आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना जामीन दिला होता. मात्र, कोलकता उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

कोलकाता - नारदा स्टिग प्रकरणाने पश्चिम बंगालमधील राजकारण तापताना दिसत आहे. ममता बॅनर्जी सरकारमधील दोन मंत्र्यांसह तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना अर्ध्या रात्री कारागृहात पाठविण्यात आले आहे. तत्पूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने सर्वांचा जामीन रद्द केली. या सर्व नेत्यांना सीबीआयने सोमवारी छापेमारीनंतर अटक केली होती. सीबीआयच्या या कारवाईनंतर, बंगालमधील पराभव पचवणे मोदी सरकारला जड जात आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची बदल्याची कारवाई करत आहेत, असे तृणमूलने म्हटले आहे.

अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने -सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात टीएमसी नेते फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, माजी टीएमसी नेते आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना जामीन दिला होता. मात्र, कोलकता उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. पक्षाच्या नेत्यांना झालेल्या अटकेविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीबीआय कार्यालयात सहा तास धरणे दिले होते. तर त्यांच्या समर्थकांनी परिसराला घेराव घातला होता. तसेच सीबीआयच्या या कारवाईविरोधात राज्यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली.

Narada Scam: ममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

पुन्हा चौकशी सुरु -पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी निवडणूक झाली. त्यात तृणमूल काँग्रेसने पुन्हा बाजी मारली आणि सत्ता कायम राखली. निवडणूक निकालानंतर काल पहिल्यांदाच राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली. यानंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या होत्या.

2017मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते चौकशीचे आदेश -उच्च न्यायालयाने 16 एप्रिल 2017 रोजीच स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. यानंतर एका विशेष न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या संबधित नेत्यांना जामीन दिली होती. सीबीआयने हे चारही नेते आणि आईपीएस अधिकारी एसएमएच मिर्झा यांच्या विरोधात आरोप-पत्र दाखल केले होते. सध्या मिर्झा जामिनावर आहेत.West Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाCBIगुन्हा अन्वेषण विभाग