शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बाबुल सुप्रियोंनी पुन्हा मारली बाजी, मूनमून सेन यांना पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:21 IST

West Bengal Lok Sabha Election Results 2019 : आसनसोल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे. 

कोलकाता: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपाने आपला संपूर्ण फोकस पश्चिम बंगालमध्ये केंद्रित केला होता. येथील आसनसोल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे. 

भाजपाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसच्या मूनमून सेन यांचा 139104 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांना 588057 मते पडली आहेत. तर मूनमून सेन यांना 413202 मते आणि कम्युनिस्ट पार्टीचे गौरंगा चॅटर्जी यांना 86809 मते पडली आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन यांचा जवळपास 70 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे बाबुल सुप्रियो यांचा विजय भाजपासाठी मह्त्वपूर्ण होता, कारण भाजपाने दार्जीलिंगशिवाय पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला होता. या विजयाचे बक्षीस सुद्धा बाबुल सुप्रियो यांना मिळाले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कबिनेटमध्ये मंत्रीपद मिळाले. याशिवाय दार्जीलिंग मतदारसंघातील एस. एस. आहलुवालिया यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. 1999 साली दोन जागांवर मिळविलेल्या भाजपाला शायनिंग इंडियाच्या घोषणा देत 2004 ची निवडणूक पश्चिम बंगालमध्ये लढवली. मात्र, 2004 मध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर 2009 मध्ये  भाजपा केवळ दार्जीलिंगची जागा मिळाली. तर 2014 मध्ये मोदी लाटेत दोन जागा मिळाल्या होत्या.  

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019asansol-pcआसनसोलLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९