शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 18:03 IST

"आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे.

कोलकात्यात स्थापन करण्यात आलेली दुर्गा मातेची मूर्ती सध्या चर्चेत आहे. या मूर्तीमध्ये मातेला महिषासुराच्या जागी एका व्यक्तीचा वध करताना दाखवण्यात आले आहे आणि ही व्यक्ती गांधीजी आहेत, असा  दावा करण्यात येत आहे. संबंधित मूर्ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांसोबत चर्चा केली. यानंतर, ही मूर्ती बदलण्यात आली आहे. या घटनेचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप, माकप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी निशेध केला आहे.

हा निव्वळ योगायोग - हिंदु महासभाकोलकात्यातील साउथ वेस्टमध्ये रुबी पार्कजवळ दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, हा केवळ एक योगा-योग असल्याचे दुर्गा पूजेचे आयोजक अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटले आहे. "चष्मा लावलेली प्रत्येक व्यक्ती गांधी असेलच असे नाही. या मूर्तीत राक्षस गांधींप्रमाणे दिसणे हा निव्वळ एक योगायोग आहे. आमच्या मूर्तीत राक्षसाने ढाल पकडलेली होती. गांधींनी कधीही ढाल पकडलेली नाही," असे महासभेचे अध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी गोस्वामी यांनी स्वतंत्र्याच्या आंदोलनातील महात्मा गांधींच्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकाही केली. 

तृणमूलने BJP-RSS वर साधला निशाणा - याप्रकरणावरून तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मूर्तीमध्ये गांधींना राक्षसाच्या रूपात दाखवून भाजपने आपला खरा चेहरा दाखवला आहे. संपूर्ण जग महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करते. पण भाजप केवळ गांधीवादी असल्याचा आव आणते, असे घोष यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर ही 'अभद्रपणाची पराकाष्ठा' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाने कारवाई करावी - भाजप "आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. महात्मा गांधींचा अपमान अस्वीकार्य आहे. प्रशासनाने आयोजकांविरोधात कारवाई करायला हवी," असे भाजप प्रवक्त्या समिक भट्टाचार्य यांनी म्टले आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीwest bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसBJPभाजपा