मायलेकींच्या घरातून येऊ लागली दुर्गंधी; शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावताच समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:52 PM2021-07-21T16:52:42+5:302021-07-21T16:54:18+5:30

पोलीस घरी येताच धक्कादायक प्रकार उघडकीस

west bengal hooghly 60 year old daughter kept dead body of her mother two days | मायलेकींच्या घरातून येऊ लागली दुर्गंधी; शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावताच समोर आला धक्कादायक प्रकार

मायलेकींच्या घरातून येऊ लागली दुर्गंधी; शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावताच समोर आला धक्कादायक प्रकार

Next

हुगळी: पश्चिम बंगालच्या हुगळीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक ६० वर्षीय मुलगी २ दिवस तिच्या आईच्या मृतदेहासोबत राहत असल्याची घटना घडली आहे. मुलीनं तिच्या आईच्या निधनाची माहिती कोणालाही दिली नाही. दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांना पोलिसांना बोलावलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मुलीचं समुपदेशन सुरू आहे.

हुगळीतील चंदनगरमधील मानकुंडू येथील एका इमारतीत आई आणि मुलगी वास्तव्यात होत्या. ६० वर्षांच्या असीमा साहा त्यांची ८३ वर्षीय आई निर्मलाबाला यांच्यासोबत राहायच्या. दोन दिवसांपूर्वी निर्मलाबाला साहा यांचा मृत्यू झाला. मात्र याची माहिती असीमा यांनी कोणालाही दिली नाही. त्यांनी आईचा मृतदेह घरातच ठेवला. दोन दिवस त्या मृतदेहासोबतच राहत होत्या.

दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी आल्यानं शेजाऱ्यांना काहीतरी बरंवाईट झाल्याचा संशय आला. त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना निर्मलाबाला यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. निर्मलाबाला यांना दोन मुलं आहेत. त्यांचा लहान मुलगा नदिया जिल्ह्यातल्या कल्याणी परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. तर मोठी मुलगी निर्मलाबाला यांच्यासोबत मानकुंडूमध्ये राहायची. मायलेकी कोणाशीही फारशा बोलायच्या नाहीत, त्या फार कोणात मिसळायच्या नाहीत, अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: west bengal hooghly 60 year old daughter kept dead body of her mother two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app