शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 7:55 PM

PM Modi Cancel Bengal Visit : मोदी 23 एप्रिलला बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या.

नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत. (West Bengal election PM Narendra Modi canceled all rallies in bengal tomorrow will hold meeting on covid19 situation)

पंतप्रधान मोदी 23 एप्रिलला सकाळी 9 वाजता कोरोना संबंधित स्थितीची समीक्षा करतील. यानंतर सकाळी 10 वाजता, ते कोरोनाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक करतील. यानंतर दुपारी 12:30 वाजता, ते व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने देशातील मोठ्या ऑक्सीजन निर्मात्यांसोबत बैठक करतील.

मोदी 23 एप्रिलला बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या. बंगाल भाजपने या सभांची तयारीही पूर्ण केली होती. मात्र, आता मोदींचे हे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यासंदर्भात मोदींनी स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे. 

या फोटोतून आपण पाहू शकता, की कोलकात्यातील शहीद मिनार मैदानात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कशा पद्धतीने व्यवस्था सुरू होती. टेंट, खुर्च्या, झेंडे-बॅनर लागलेले आहेत. मालदामध्येही अशीच तयारी दिसून आली. मात्र, आता पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला आहे.

बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत - तत्पूर्वी, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच मोदी काही छोट्या सभा करतील. या सभांना 500च्या वर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल, असा निर्णय भाजपने घेतला होता. याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांच्या बंगालमध्ये छोट्याच सभा केल्या जातील, असा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१