शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

West Bengal Election 2021: ...तर भाजपाला ५० जागाही मिळाल्या नसत्या; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 9:15 AM

निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. या विजयानंतर बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपाला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  (West Bengal Election 2021)

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. जर निवडणूक आयोगानं भाजपाला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजपा ७० पारही जाणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी मुलाखतीत सांगितलं.

नंदीग्रामच्या लढतीवरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला असून भाजपाला १०० च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आलं आहे. भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस पक्षानं बहुमताचा आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला.

नंदीग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी यांच्यात आघाडी-पिछाडीचा खेळ सुरूच होता. एक वेळ तर ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचीही माहिती समोर आली होती. पण अखेरच्या फेरीनंतर शुभेंदु अधिकारी यांनी १९५६ मतांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी नंदीग्रामच्या लढतीत मुख्यमंत्री ममता दीदी यांना पराभवाचा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग