नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:48 IST2025-08-06T16:48:13+5:302025-08-06T16:48:35+5:30
कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला वाचवलं आहे.

नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
पश्चिम बंगालमधील हावडा येथे एका ई-रिक्षा चालकाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला वाचवलं आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ई-रिक्षा चालक चंदन मलिक हा बालीतील पंचनाला येथून जात असताना त्याला निवेदिता सेतूजवळ कचऱ्याचा ढीग पडलेला दिसला.
चंदनने नीट काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा त्याला कचऱ्यात हालचाल जाणवली. एक नवजात बाळ पडलेलं आढळलं. वेळ वाया न घालवता चंदनने इतर लोकांच्या मदतीने मुलीला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं. जिथे चिमुकलीवर उपचार सुरू आहेत.
ई-रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ किमान तीन ते चार तासापासून तिथेच पडून होतं. तिच्या शरीराला किडे लागले होते. आम्ही तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असून ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. नवजात बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.