West Bengal doctor's calling off the strike |  पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे 
 पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे 

कोलकाता - आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधीलडॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपकर्ते डॉक्टर यांच्यात झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. 

संपकर्त्या डॉक्टरांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. तसेच संपकर्ते डॉक्टर लवकरच कामावर परततील, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष आणि प्रत्येक रुग्णालयात एक नोडल पोलीस अधिकारी तैनात करण्याची डॉक्टरांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. 

बंगालमधील एका रुग्णालयात वृद्ध रुग्णाच्या झालेल्या मृत्युनंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती. या मारहाणीत हा डॉक्टर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर बंगालमधील डॉक्टर संपावर गेले होते. तसेच या डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला होता.   


Web Title: West Bengal doctor's calling off the strike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.