अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:36 PM2021-06-14T20:36:14+5:302021-06-14T20:37:51+5:30

“आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालचे नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल."

West bengal CM mamata banerjee targets bjp for abolishing article 370 said it ended freedom of kashmiris | अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

Next

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुच्छेद 370 हटविल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अनुच्छेद 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्य, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे हित कमकुवत झाले आहे, असे ममतांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही - 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालच्या नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल." एवढ्यावरच ममता थांबल्या नाही, तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना कसल्याही प्रकारची शरम नाही, असेही ममता म्हणाल्या. 

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

एक देश-एक रेशन कार्ड प्रणालीला विरोध नाही -
सर्वोच्च न्यायालयाच्या एक देश एक रेशन कार्ड धोरणाचा स्वीकार करण्यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "आम्हाला एक जेश-एक रेशन कार्ड प्रणालीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही. आम्ही तीन महिन्यांतच लागू करू. काही लोकांकडे आधारकार्ड नाही, आम्ही तयार करत आहोत," असेही ममता म्हणाल्या.

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -
टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

Web Title: West bengal CM mamata banerjee targets bjp for abolishing article 370 said it ended freedom of kashmiris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.