शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोण असेल पंतप्रधानपदाचा उमेदवार; बहुचर्चित प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 13:50 IST

भाजपाकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला ममता बॅनर्जींचं उत्तर

कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून महाआघाडीची उभारणी सुरू आहे. मात्र विरोधकांचं नेतृत्त्व कोण करणार, पंतप्रधानपदाचं उमेदवार कोण असणार, याबद्दल अद्याप महाआघाडीकडून कोणतंही सुतोवाच करण्यात आलेलं नाही. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आज या प्रश्नाला उत्तर दिलं. सीबीआय विरुद्ध कोलकाला पोलीस या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर ममता यांना न्यायालयाच्या निर्देशांवर भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयानं कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना सीबीआयला सहकार्य करण्याच्या सूचना केल्यानंतर ममता बॅनर्जींनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे आमचा नैतिक विजय झाल्याचा दावा त्यांनी केला. केंद्राकडून घटनेचं उल्लंघन सुरू असल्याचा आरोप ममता यांनी केला. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करू, असंदेखील त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांना विरोधकांचं नेतृत्त्व कोण असेल? महाआघाडीचा पंतप्रधान कोण असेल?, असे प्रश्न विचारण्यात आले. आमच्याकडे सर्वजण पंतप्रधान असतील. देशातला प्रत्येकजण पंतप्रधान असेल. आमचं सरकार जनतेचं सरकार असेल, असं ममता म्हणाल्या. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना अप्रत्यक्ष टोला लगावला. या देशात कोणीही बॉस होऊ शकत नाही. फक्त लोकशाहीच इथली बिग बॉस आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. केंद्र सरकारवर टीका करताच कारवाई सुरू होते, असा आरोपही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा बंगालसह देशातील नागरिकांचा विजय आहे. आम्ही या लढाईत एकटे नाही. सर्व जनता आमच्यासोबत आहे, असं ममता यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय