West Bengal bomb blast kills 3 suspects, injures one | पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब स्फोटात ३ संशयित ठार तर एकजण जखमी 
पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब स्फोटात ३ संशयित ठार तर एकजण जखमी 

मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी क्रूड बॉम्बच्या स्फोटात तीन संशयित तस्कर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. 

बीएसएफ जवान जेव्हा भारत-बांगला सीमेवरील तस्करी रोखण्यासाठी गेले होते.  तेव्हा तस्करी करणारे जनावरांच्या मानेवर सॉकेट बॉम्ब बांधत असल्याचं आढळले. बांगलादेशात तस्करीसाठी कुख्यात असलेल्या फरझीपारा गावात सीमारेषा पार करण्यासाठी पशुपालकांची तयारी करीत असताना आणखी एक संशयित तस्कर जखमी झाला, असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

"हे गाव जनावरांच्या तस्करीसाठी कुख्यात आहे. आम्हाला संशय आहे की जे मरण पावले ते गुरे तस्कर होते. ते गोवंश सीमापार तस्करीसाठी तयार करीत होते. ते सहसा जनावरांच्या गळ्याभोवती सॉकेट बॉम्ब बांधतात जेणेकरून बीएसएफने त्यांना पकडले तर बॉम्बने आमच्या जवानांना ठार मारले जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
 

Web Title: West Bengal bomb blast kills 3 suspects, injures one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.