West Bengal BJP :पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. भाजप आमदार शंकर घोष आणि खासदार खगेन मुर्मू यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही नेते जलपाईगुडी येथे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित लोकांनी हल्ला केल्याचा दावा भाजप आयटी विंगचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.
पूरग्रस्तांना मदत वाटप करताना हल्ला
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सिलीगुडीचे आमदार डॉ. शंकर घोष आणि मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू पूरग्रस्तांना मदतसामग्री वाटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी काही लोक चिडले आणि त्यांनी वाद घालण्यास, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आमदार आणि खासदार यांच्या अंगरक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने दगडफेक सुरू केली. एक दगड मुर्मू यांच्या डोक्याला लागला, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
अमित मालवीय यांची तृणमूल काँग्रेसवर टीका
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली. ते म्हणाले, “उत्तर मालदाचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते खगेन मुर्मू यांच्यावर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केला. ते जलपाईगुडीच्या डुआर्स परिसरातील नागराकाटा येथे मुसळधार पाऊस, पूर आणि भू-स्खलनानंतर मदतकार्यासाठी गेले होते. भाजप नेते मदत करत असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता कार्निव्हलमध्ये नाचत होत्या, राज्य प्रशासन मदत करत नव्हते,” अशी टीका त्यांनी केली.
खगेन मुर्मू कोण आहेत?
खगेन मुर्मू हे मालदाह उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यापूर्वी ते २००६ ते २०१९ पर्यंत हबीबपूर मतदारसंघाचे आमदार होते. मूळ सीपीआय(एम) चे सदस्य असलेले मुर्मू २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील झाले आहेत.
Web Summary : BJP MP Khagen Murmu and MLA Shankar Ghosh were attacked in Jalpaiguri while distributing aid to flood victims. TMC is accused. Murmu was injured.
Web Summary : जलपाईगुड़ी में बाढ़ पीड़ितों को सहायता बांटते समय भाजपा सांसद खगेन मुर्मू और विधायक शंकर घोष पर हमला हुआ। टीएमसी पर आरोप है। मुर्मू घायल हो गए।