शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

"...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे", श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 10:35 IST

Srabanti Chatterjee And West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चॅटर्जींनी भाजपात प्रवेश केला.

नवी दिल्ली - बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चॅटर्जींनी भाजपात प्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, यंदाही पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे.

श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. "मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती यांनी म्हटलं आहे. "मला तृणमूल काँग्रेसमधून कोणताही प्रस्ताव आला नाही. हा, मी दीदींचा (ममता बॅनर्जी) आदर करते. दीदींसोबत मी एकाच व्यासपीठावर राहिली आहे. त्यांच्यासोबत प्रचारसाठीही गेले आहे. पण मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. 

"पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे डाव्या पक्षाने आणि 10 वर्ष तृणमूल काँग्रेसने सत्ता चालवली आहे. पण जितका विकास बंगालमध्ये व्हायला हवा होता, तितका तो झालेला नाही. मला वाटत आमच्या सोनार बांगलाचा विकास व्हायला हवा. त्यामुळे मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. यातच आता बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. 

"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश

टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी