सर्वसमावेशक शासनासाठी भाजपला मते द्या, योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:23 IST2026-04-13T06:22:33+5:302026-04-13T06:23:24+5:30

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये सत्ताधाऱ्यांकडून तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी राज्यात सर्वसमावेशक शासन व्यवस्था आणण्यासाठी ‘डबल-इंजिन’ सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

West Bengal Assembly Election 2026: Vote for BJP for inclusive governance: Adityanath | सर्वसमावेशक शासनासाठी भाजपला मते द्या, योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

सर्वसमावेशक शासनासाठी भाजपला मते द्या, योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

सोनमुखी (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये सत्ताधाऱ्यांकडून तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी राज्यात सर्वसमावेशक शासन व्यवस्था आणण्यासाठी ‘डबल-इंजिन’ सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

बांकुरा जिल्ह्यातील सोनमुखी येथे जाहीर सभेत आदित्यनाथ म्हणाले की, ज्यांनी देशाच्या आध्यात्मिक साधनेला समृद्ध केले ते स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांची भूमी म्हणून बंगाल ओळखला जातो. परंतु, तृणमूल काँग्रेस याच व्यक्तिमत्त्वांचा अनादर करीत आहे. बंगाल आता गुंडगिरीचे केंद्र बनले आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.

अत्याचार इतिहासजमा 
उत्तर प्रदेशात लांगुलचालन नव्हे, तर समावेशक शासन आहे. इथे प्रत्येक समुदाय सुरक्षित वातावरणात शांततेने राहू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करेल आणि अत्याचार, आणि हत्या अशा गोष्टी भूतकाळात जमा होतील, असे आदित्यनाथ म्हणाले.

Web Title : सर्व-समावेशी शासन के लिए भाजपा को वोट दें: योगी आदित्यनाथ का आह्वान

Web Summary : योगी आदित्यनाथ ने बंगाल में समावेशी शासन के लिए भाजपा को वोट देने का आग्रह किया, सत्तारूढ़ दल की तुष्टीकरण नीतियों की आलोचना की। उन्होंने दावा किया कि बंगाल अब गुंडागर्दी का केंद्र है। भाजपा ने मोदी के नेतृत्व में अत्याचारों को खत्म करने का वादा किया।

Web Title : Vote BJP for inclusive governance, Yogi Adityanath appeals in Bengal.

Web Summary : Yogi Adityanath urges Bengal voters to elect a BJP 'double-engine' government for inclusive governance, criticizing the ruling party's appeasement policies. He claims Bengal is now a hub of hooliganism. BJP promises to end atrocities under Modi's leadership.