शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 18:12 IST

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

खडगपूर: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते, मंत्री पश्चिम बंगालच्या विविध भागांत प्रचारसभांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तिथे काल रात्री ४५ मिनिटे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं होतं. परंतु, बंगालमध्ये विकास डाऊन झालाय, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. (west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issues)पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'यंदा भारतीय जनता पक्षाला संधी द्या. आम्ही ७० वर्षांपासून सुरू असलेला अन्याय दूर करू. एकदा आशीर्वाद द्या. पाच वर्षांसाठी आम्हाला संधी देऊन पाहा. आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू, असं आवाहन मोदींनी बंगाली मतदारांना केला. 'तुम्ही काँग्रेसचे कारनामे पाहिलेत. डाव्यांची राज्याला कसं उद्ध्वस्त केलं याचे तुम्ही साक्षीदार आहात आणि आता तृणमूल काँग्रेसचा कारभार अनुभवत आहात. त्यामुळे आता ५ वर्षांसाठी भाजपला संधी देऊन बघा,' असं मोदी म्हणाले.रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीकाखडगपूर येथे आयोजित एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभागी होत जनतेला संबोधित केले. रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ५० ते ५५ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते, सुमारे तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. बंगालमध्ये अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. येथे केवळ एकच इंडस्ट्री सुरू आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवारआता विकासाचा खेळ सुरू होणारममता दीदी म्हणतात खेळ संपला, पण सत्य हे आहे की, विकास सुरू होणार आहे. ममता बॅनर्जी सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी