CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:07 PM2021-04-26T22:07:36+5:302021-04-26T22:10:07+5:30

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission | CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

Next
ठळक मुद्देममता बॅनर्जींची निवडणूक आयोगावर टीकामद्रास उच्च न्यायालयाचे केले स्वागतनिवडणूक आयोग जबाबदारी झटकू शकत नाही - ममता दीदी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता अखेरचा टप्पा राहिला असून, २ मे रोजी पाचही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकदा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करत, केंद्रीय दलांमुळे कोरोना पसरतोय, असा दावाही त्यांनी केली. (west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission)

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तरीही पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीका केली आहे. निवडणूक आयोगासह अन्य केंद्रीय दलांनी बंगालमधून निघून जावे. यांमुळेच कोरोना अधिक फैलावत आहे, असा पुनरुच्चार ममता दीदींनी केला.

आता सर्वोच्च न्यायालयातही होणार ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर; सरन्यायाधीशांनी दिली मंजुरी

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

ममता बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशाचे स्वागत केले असून, निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी निवडणूक आयोग कारणीभूत असून, आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

“पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले

एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालायने राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला. देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे म्हणत  निवडणूक आयोगाला फटकारले. तसेच, न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून असल्याने न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे.

कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

दरम्यान, कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.