Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 07:07 PM2021-04-26T19:07:45+5:302021-04-26T19:10:07+5:30

Oxygen Shortage: भाजप नेते प्रसाद लाड यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

congress claims that state has not received single rupee for oxygen plant from pm care fund | Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाभाजप नेते प्रसाद लाड यांनी माफी मागावीप्रसाद लाड यांचे बिनबुडाचे आरोप - काँग्रेस

मुंबई: देशातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असून, ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जिल्हा मुख्यालय स्तरावर १५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यापूर्वी केंद्र सरकारने जानेवारीमध्ये देशभरात ऑक्सिजन प्लांट  उभारण्याचे जाहीर केले होते. त्यातील ३३ प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू असून यातील एकही प्लांट आजपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. या योजने अंतर्गत महाराष्ट्रात १० प्लांट उभारण्यात येणार होते पण अद्याप केंद्र सरकारने एकाही प्लांटच्या उभारणीचे काम सुरू करणे दूरच साधी टेंडर प्रक्रियाही राबवलेली नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (congress claims that state has not received single rupee for oxygen plant from pm care fund)

विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

केंद्र सरकारच्या गलथानपणावर पांघरून घालून महाराष्ट्राची बदनामी करण्याची मोहिम भाजप नेते राबवत आहेत. प्रसाद लाड यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी लाड यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

देशभरात हजारो कोरोना मृत्यू

केंद्र सरकारमुळे देशभरात दररोज हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकारने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, वैद्यकीय उपकरणे या सर्वांच्या खरेदी आणि वाटपावर स्वतःचे नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारांना ती खुल्या बाजारातून खरेदी करता येत नाहीत आणि केंद्र सरकारही ही साम्रगी पुरवत नाही. पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी जात नाही. हे प्लांट उभारण्याचे काम केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरमार्फत करण्यात येत आहे. ज्या कामासाठी एका नव्या पैशाचा निधीच मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला, अशी विचारणा करत यात भ्रष्टाचार झाला, असे वाटत असेल तर तो भ्रष्टाचार केंद्र सरकारच्या पातळीवर झाला असण्याची शक्यता आहे, अशी टीका करण्यात आली.

चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

लाड यांचे बिनबुडाचे आरोप

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबतचे पत्र केंद्र सरकारने दिले आहे. केंद्र सरकार स्वतःच हे प्लांट उभारणार आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आजपर्यंत एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला नाही. आणि  महाराष्ट्रात तर एकही प्लांट उभारण्यास सुरुवातही झाली नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच प्रसाद लाड बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे लोंढे यावेळी म्हणाले.

मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीतच एकवाक्यता नाही: देवेंद्र फडणवीस

हीच परिस्थिती देशभरात आहे

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव विनायक निपुण यांना दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून पीएम केअर फंडामार्फत दिल्लीत उभारण्यात येणाऱ्या नऊ पैकी केवळ एका ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम झाले आहे पण तो ही कार्यान्वित नाही असे सांगितले. इतर प्लांट कधी उभारले जातील याचे उत्तरही ते न्यायालयाला देऊ शकले नाहीत. हीच परिस्थिती देशभरात आहे. केंद्र सरकारने PSA प्लांट उभारणीबाबत घोषणेशिवाय काहीही केलेले नाही. कोरोनाच्या या संकटकाळात केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरची भूमिका संशयास्पद आहे त्यामुळे सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी लोंढे यांनी केली.
 

Web Title: congress claims that state has not received single rupee for oxygen plant from pm care fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.