CoronaVirus: कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:26 PM2021-04-26T18:26:51+5:302021-04-26T18:28:19+5:30

CoronaVirus: केंद्र सरकारकडून जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे.

coronavirus dr vk paul says even within the family wear a mask | CoronaVirus: कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

CoronaVirus: कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना काळात मास्क घालणे अनिवार्यघरबसल्याही मास्क घालण्याची वेळकेंद्राचा गंभीर इशारा

नवी दिल्ली: देशात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे. आता घरबसल्याही मास्क घालण्याची वेळ असल्याचे सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. (coronavirus dr vk paul says even within the family wear a mask)

केंद्र सरकारच्या नीती आयोगातील आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे पॉल यांनी म्हटले आहे. 

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न

देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेत ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेसची सेवा दिली जात आहे. विशाखापट्टनमनंतर गुजरातमधील हापा येथे असलेल्या रिलायन्सच्या प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाली. या तीन ट्रकपैकी दोन ऑक्सिजन ट्रक मुंबई, तर एक पुण्याला पाठवण्यात आला आहे. 

मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीतच एकवाक्यता नाही: देवेंद्र फडणवीस

केंद्रातील मोदी सरकारकडून महत्वाचा निर्णय

देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

दरम्यान, सरकारी रुग्णालयात वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यामागे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय यामागे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. मागणी एवढा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू राहील, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: coronavirus dr vk paul says even within the family wear a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.