शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Video : आसनसोल पोटनिवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवाराचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:54 AM

Asansol Lok Sabha Bypoll: या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा  प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मंगळवारी लोकसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचार झाला. या जागेवर भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल निवडणूक लढवत आहेत. अग्निमित्रा पॉल यांनी आपल्या ताफ्यावर टीएमसी समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा  प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा ताफा एका मार्गावरून जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने लोक ताफा अडवण्याचा प्रयत्न करत असून गाड्यांवर हल्ला करत आहेत. यावेळी त्यांच्या हातात बांबूच्या काठ्या दिसून येत आहेत. यावर अग्निमित्र पॉल यांनी टीएमसीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. मात्र, पोलिसांनी काहीही केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

टीएमसी समर्थकांनी माझ्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांवर बांबूच्या काठीने हल्ला केला. ममता बॅनर्जी काहीही करा, विजय भाजपचाच होईल, असे अग्निमित्रा पॉल यांनी सांगितले. तसेच, त्या म्हणाल्या की,"मला लाज वाटते की एका महिला आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नादिया अल्पवयीन बलात्कार आणि हत्या प्रकरणावर लाजिरवाणी टिप्पणी केली की, बलात्कार पीडितेचे प्रेमसंबंध होते की ती गर्भवती होती? हे पाहावे लागेल."

दोन जागांवर पोटनिवडणूकपश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजता कडक बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. आसनसोलमधील 2,012 मतदान केंद्रांपैकी एकूण 680 आणि बालीगंजमधील सर्व 300 मतदान केंद्रे 'संवेदनशील' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आसनसोलमध्ये जवळपास 15 लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. बालीगंजमध्ये सुमारे अडीच कोटी मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघात केंद्रीय दलाच्या एकूण 133 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यापैकी 70 बालीगंज आणि उर्वरित आसनसोलमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बाबुल सुप्रियो यांनी भाजपमधून टीएमसीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा दिला, तर बालीगंजचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या कारणांमुळे या दोन्ही जागांवर मतदान होत आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBabul Supriyoबाबुल सुप्रियोMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा