शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 08:08 IST

बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे.

कोलकाता : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील निवडणुकांचा चेहरा मोहराच बदलला आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेता येणार नाहीत. यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे. बिहारनंतर अमित शहा आजपासून व्हर्च्युअल रॅलीने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातील निवडणूक होणार आहे. मात्र, भाजपा आतापासूनच कामाला लागली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्याचे जदयूच्या नितिश कुमारांचे सरकार आहे. यामुळे तिथे प्रचाराची फारशी गरज नसली तरीही दगाफटका झाल्यास तयारी हवी म्हणून शहांनी पहिली व्हर्च्युअल रॅली घेतली आहे. आता मोर्चा कधीही हाती न आलेल्या प. बंगालकडे वळविला आहे. 

अमित शहा वेगवेगळ्या मिडीया प्लॅटफॉर्मवरून ११ वाजता भाजपाच्या कार्यर्त्यांसह सामान्य़ मतदारांशी संवाद साधणार आहेत. या रॅलीमध्ये तेथील भाजपाचे वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. बंगाल बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, ही रॅली राज्यातील राजकीय वातावरणच बदलून टाकणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची ही पहिली रॅली असणार आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून जागतिक रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न आहे. 

बिहारमध्ये काय केले होते? बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे. ही रॅली अशासाठीही महत्वाची आहे की, गेल्या दोन् तीन महिन्यांनंतर पहिलीच राजकीय घडामोड घडत आहे. बंगालमध्ये ८० हजार बूथ आहेत. तर भाजपाचे ६५ हजार बूथवर अस्तित्व आहे. प्रत्येक बुथ कमिटीमध्ये ५ सदस्य आहेत. तर सरासरी १० ते १५ सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी ही रॅली पाहिली तर ५ लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. तसेच २५ हजारावर व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. त्यावरही रॅलीची जाहिरातबाजी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही त्यांना मोबाईलनंबर देण्यात आला आहे. याद्वारे ते भाषण ऐकू शकणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या