शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:20 IST

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय पुन्हा टीएमसीमध्ये परतल्यानंतर, आता तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी, येणाऱ्या काळात अनेक भाजप आमदार टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला आहे. रॉय म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच, टीएमसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची मोठी रांग आहे. (West bengal 24 bjp mlas are in west bengal are in touch to join tmc claims mukul roy)

याचा वर्षी जूनमध्ये, मुकुल रॉय स्वतःच भाजप सोडून टीएमसीमध्ये परतले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले.

भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि हे सर्व 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपमध्ये सामील झाले होते.

 गेल्या आठवड्यात पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत सौमेन रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष टीएमसीमध्ये परतले. दुसऱ्याच दिवशी, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बागडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजित दासही टीएमसीमध्ये सामील झाले. सौमेन रॉय टीएमसीमध्ये सामील झाल्यामुळे, आता बंगाल विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 71 वर आली आहे.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली; PM मोदींचे सर्व मंत्र्यांना खास निर्देश

पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर -केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यांपैकी एक भवानीपूरची जागा आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळीही भाजप ममतांच्या विरोधात मोठ्या चेहऱ्यांवर डाव लावण्याचा विचार करत आहे. असे असतानाच तृणमूल काँग्रेसही भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा