शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 7:28 PM

बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भाजप आमदारच राजभवनात जाऊ शकले.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भाजप आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. (West bengal 23 BJP MLA absent while suvendu adhikaris visit to raj bhawan)

सुवेंदू अधिकारी, राज्यातील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले एकूण 51 आमदारही होते. मात्र, विधानसभेत भाजपच्या एकूण आमदारांची संख्या 74 आहे. या आमदारांनी हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे.

इतर 23 आमदार का होते अनुपस्थित?सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यापालांच्या बेटीसाठी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत केवळ 51 आमदारच होते. उर्वरित 23 आमदार अधिकारी यांच्यासोबत गेले नाही. यावरून आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसमधून भाजपत आलेले अनेक नेते, पुन्हा टीएमसीत जात असतानाच असा प्रकार घडला आहे.

ममता बॅनर्जींचा पुन्हा खेला होबे; लवकरच भाजपला आणखी धक्के देणार

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, सुवेंदूंसोबत न गेलेल्या नेत्यांसंदर्भात अद्याप भाजपने कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

ज्यांनी विश्वासघात केला त्यांना पक्षात स्थान नाही - ममतामुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी ममता म्हणाल्या, मुकूल आपल्याच घरातील सदस्य आहेत. ते आपल्या घरी परत आले. मी त्यांचे अभिनंदन करते. निवडणुकीदरम्यान मुकूल यांनी आपल्यासोबत विश्वासघात केला नाही. ज्या लोकांनी विश्वासघात केली, त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. याच वेळी मुकूल रॉय यांना महत्वाची भूमिका दिली जाईल, असेही ममता म्हणाल्या.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMLAआमदार