West Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:20 IST2018-10-23T21:26:59+5:302018-10-23T22:20:45+5:30

पश्चिम बंगालमधील हावडाजवळील संतारागाछी जंक्शन येथे रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली.

West Bengal: 14 injured in a stampede in Santragachhi junction | West Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी

West Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी

कोलकाता - पश्चिम बंगालमधील हावडाजवळील संतरागाछी जंक्शन येथे रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली असून, या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत.  मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकातील फूट ओव्हरब्रिजवर अचानक गर्दी झाली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. 




मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हावडापासून 10 किमी दूर असलेल्या संतरागाछी रेल्वे स्थानकात काही ट्रेन अचानक आल्याने ओव्हरब्रिजवर गर्दी झाली. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य 14 प्रवासी जखमी झाले. यापैकी तीन जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आले. तर अन्य जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

Web Title: West Bengal: 14 injured in a stampede in Santragachhi junction