शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही घाबरलेलो नाही : चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेच्या वृत्तावर अमेरिकेचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 00:50 IST

चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने एका टष्ट्वीटमध्ये कथित जाणकारांच्या हवाल्याने अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली : चीनच्या सरकारी दैनिकाने चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत दिलेल्या वृत्तावर अमेरिकेने चीनला चिमटा काढला आहे. याबाबत अमेरिकी नौदलाने म्हटले की, ‘आम्ही घाबरलेलो नाही’.चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने एका टष्ट्वीटमध्ये कथित जाणकारांच्या हवाल्याने अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘चीनकडे विमानवाहू नौकाविरोधी डीएफ-२१डी आणि डीएफ-२६ यासारखी ‘एअरक्राफ्ट कॅरिअर किलर’ आहेत. दक्षिण चीन समुद्र पूर्णत: ‘पीएलए’च्या (चिनी लष्कर) निगराणीत आहे. अमेरिकेच्या कोणत्याही विमानवाहू नौकेची या परिसरातील हालचाल ‘पीएलए’साठी सुखकारक बाब असेल : विश्लेषकांचे मत.’ या टष्ट्वीटला प्रत्युत्तर देताना अमेरिकी नौदलाच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याने एक टष्ट्वीट केले आहे. त्यात म्हटले की, ‘असे असूनही ते तेथे आहेत. दोन अमेरिकी नौदलाच्या विमानवाहू नौका दक्षिण चीन समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत परिचालन करीत आहेत. यूएसएस निमिट्झ आणि यूएसएस रोनाल्ड रिगन घाबरलेल्या नाहीत’. या टष्ट्वीटला अमेरिकी अधिकाºयाने ग्लोबल टाइम्सचा रिपोर्ट टॅग केलाआहे. त्याला ‘अ‍ॅटअवरडिस्क्रेशन’ असा हॅशटॅग दिला आहे.सरावासाठी युद्धनौका पाठविल्या चीन सागरातयूएसएस निमिट्झ आणि यूएसएस रोनाल्ड रिगन ही अमेरिकेच्या युद्ध नौकांची नावे असून या युद्ध नौका सध्या दक्षिण चीन सागरात आहेत. लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी या युद्ध नौका अमेरिकेने दक्षिण चीन सागरात पाठविल्या आहेत.अमेरिकेचा हा युद्धाभ्यास दीर्घकाळापासून नियोजनात होता. चीनने वादग्रस्त ‘पार्सल आयलँड’जवळ लष्करी सराव आयोजित केल्यानंतर अमेरिकेनेही तातडीने आपल्या लष्करी सरावाच्या निमित्ताने दोन्ही नौका या भागात पाठविल्या.अलीकडील काही दिवसांपासून चीनने आपल्या लष्करी हालचाली आक्रमक केल्या आहेत. भारतीय सीमेवरही चीनकडून खोडसाळ कारवाया सुरू आहेत. दक्षिण चीन समुद्रातील आपल्या कारवायांत अमेरिकेचा हस्तक्षेप टाळण्यासाठी चीनकडून आक्रमक हालचाली केल्या जात असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

टॅग्स :United Statesअमेरिकाchinaचीनsouth china seaदक्षिण चिनी समुद्रInternationalआंतरराष्ट्रीय