कपड्यात लपवून ठेवलेले १५ किलो सोने घेऊन जात होते, पोलिसांनी गाडी तपासणीसाठी थांबवली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:11 IST2024-12-21T13:05:49+5:302024-12-21T13:11:15+5:30

सुरत पोलिसांनी १५ किलो सोन पकडले आहे. हे सोन एक कारमधून घेऊन जात होते.

were carrying 15 kg of gold hidden in their clothes, the police stopped the car for inspection | कपड्यात लपवून ठेवलेले १५ किलो सोने घेऊन जात होते, पोलिसांनी गाडी तपासणीसाठी थांबवली अन्...

कपड्यात लपवून ठेवलेले १५ किलो सोने घेऊन जात होते, पोलिसांनी गाडी तपासणीसाठी थांबवली अन्...

सुरतमध्ये पोलिसांनी एका कारमधून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले आहे. हे सोने आरोपींनी कपड्यात सोने लपवले होते. पोलिसांनी गाडीची तपासणी केली, यावेळी हे सोने सापडले. आता आरोपींची चौकशी सुरू आहे.

प्रत्यक्षात सासोरी पोलिस ठाण्याचे पथक रात्री गस्त घालत होते. दरम्यान, सेलेरियो कारमध्ये काही लोक मोठ्या प्रमाणात सोने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

GST कौन्सिलची आज बैठक, विम्याच्या प्रीमियमपासून ते फूड ऑर्डरपर्यंत या गोष्टी होणार स्वस्त

पोलिसांनी सिमाडा चेकपोस्टवर नाकाबंदी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. तेवढ्यात पोलिसांना एक सेलेरियो गाडी येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तेथे उपस्थित लोकांची चौकशी सुरू केली.

सुरुवातीला दोन्ही आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. तपासात कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले सुमारे १५ किलो सोन असल्याचे समोर आले.

आरोपींची पोलिस चौकशी अजूनही सुरू 

सोने सापडताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत एका आरोपीने सांगितले की, हे सोने महिधरपुरा येथून उंबेल येथील कारखान्यात घेऊन जात होता. आरोपींची पोलिस चौकशी अजूनही सुरू आहे.

हे सोने कोणाचे होते आणि आरोपींनी सांगितलेल्या कारखान्यात ते का नेले जात होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात अन्य लोकांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांना आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सुरतमधून आणखी एक प्रकरण समोर आले आहे, तिथे चोरट्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर हल्ला केला. चोरट्यांनी बाजूची भिंत कापून तिजोरी लुटली. यानंतर त्यांनी तिथे असलेल्या ७५ पैकी ६ लॉकरमधून सामानांची चोरी केली.
 

Web Title: were carrying 15 kg of gold hidden in their clothes, the police stopped the car for inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.