शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदींना लोकशाहीचे धडे द्यायला गेले आणि कपिल सिब्बल स्वत: ट्रोल झाले, वाचा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:15 PM

Kapil Sibal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली असून, ट्विटर युझर्सनी त्यांचीच हजेरी घेण्यास सुरुवात केली. कपिल सिब्बल यांनी लोकशाहीवर ज्ञान देणे ट्विटरवरील युझर्सना फारसे रुचले नाही. त्यांनी काँग्रेसलाच उलट आरसा दाखवण्यास सुरुवात केली. (went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll)

सिब्बल म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जगातील सर्वं लोकशाहींची जननी असा उल्लेख केला. आता योगी आणि हिमंता बिस्व शर्मा यांनी मोदींचे हे बोल ऐकले असतील, अशी अपेक्षा आहे. कपिल सिब्बल यांनी या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्या लोकशाहीबाबतच्या कटिबद्धतेवर शंका उपस्थित केली. भाजपाचे हे दोन्ही मुख्यमंत्री फायरब्रँड म्हणून ओळखले जातात. तसेच हिंदुत्वाच्या राजकारणाचे ते चर्चित चेहरेही आहे. त्यातील हिमंता बिस्व शर्मा हे तर आधी काँग्रेसचमध्येच होते. दरम्यान, नेटिझन्सना कपिल सिब्बल यांची ही टिप्पणी रुचली नाही. ते त्यांना ट्रोल करू लागले. 

सुमन मंडल नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले की, कपिल सिब्बल जी, तुम्ही आणि तुमचे जी-२३ मधील सहकारी लवकरच काँग्रेसमध्ये लोकशाही स्थापित करण्यामध्ये आणि मेरिटोक्रसीला प्रमोट करण्यामध्ये लवकरच सक्षम व्हाल अशी मी अपेक्षा करते.  राजेश जोशी नावाच्या एका युझरने सिब्बल यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत लिहिले की, तुम्ही त्या पार्टीशी संबंधित आहात ज्यांनी देशामध्ये आणीबाणी लादली होती आणि लोकशाहीचा गळा आवळला होता. आज कुणीही काहीही बोलतो की लोकशाही नाही आहे.  रघू नावाचा्या एका युझरने विचारले की, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि पंजाबमध्ये लोकशाही आहे का? बंगालमध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट अशा निवडणुकोत्तर हिंसाचार झाला आणि काँग्रेसने यावर एक ब्र सुद्धा काढला नाही.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी