वजन आणि माप खात्यातर्फे विविध्
By Admin | Updated: August 29, 2015 00:20 IST2015-08-29T00:20:48+5:302015-08-29T00:20:48+5:30
वजन आणि माप खात्यातर्फे विविधहायस्कूलमध्ये ग्राहक जागृती कार्यक्रम

वजन आणि माप खात्यातर्फे विविध्
व न आणि माप खात्यातर्फे विविधहायस्कूलमध्ये ग्राहक जागृती कार्यक्रम मडगाव: वजन आणि माप खात्याच्या दक्षिण विभाग मडगाव कार्यलयातर्फे सासष्टी तालुक्यातील आठ विविध हायस्कूल मधून ग्राहक जागृती कार्यक्रम घेण्यात आला यात सुमारे दोन हजार विद्याथ्यानी लाभ घेतला.यावेळी ग्राहकांना त्याचे हक्क व वजन आणि माप खात्याची भूमिका यासंबधी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.तसेच विद्यार्थ्याना कोणतीही पॅकड वस्तू खरेदी करताना खबरदारी घ्यावी यासंबधी माहिती देण्यात आली.यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यानी पुन्हा असा कार्यक्रम घडवून आणावेत अशी मागणी केली.यात वजन आणि माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक अरूण पंचाव2डकर निरिक्षक डि.एन. मापारी यांनी मार्गदशर्न केले.हा जागृती कार्यक्रम सेंट जोजेफ हायस्कूल आके,रेजीना हायस्कूल असोळणा, सेंट जुडस हायस्कूल बेताळभाटी,सेंट पियुस एक्स हायस्कूल ओर्ली, अवर लेडी ऑफ लॉडर्स हायस्कूल उतोर्डा,सेंट मेरी ऑफ द एंजल कॉन्व्हेंट हायस्कूल चिंचोणे, सेंट अँथोनी हायस्कूल माजोर्डा व फा.आग्नेल मल्टीपर्पज हायस्कूल वेर्णा या हायस्कूल मध्ये हा जागृती कार्यक्रम घेण्यात आला.(प्रतिनिधी)ढँ3 : 2808-टअफ-11कॅप्शन: चिंचोणे येथील सेंट मेरी ऑफ द एंजल कॉन्व्हेट हायस्कुल मध्ये ग्राहक जागृती कार्यक्रमात विद्यार्थ्याना मार्गदशर्न करताना वजन आणि माप खात्याचे निरिक्षक डि.एन. मापारी सोबत अमित नाईक.