शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

साप्ताहिक राशीभविष्य - 9 ते 15 जानेवारी 2022 - भाग्याची साथ मिळेल, प्रवासाचा योग येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 09:32 IST

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष - ग्रहमानाची अनुकूलता राहील. मन प्रसन्न राहील. नोकरीत प्रगती होईल. दूरचा प्रवास कारावा लागेल. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. बऱ्याच दिवसांपासून अडून राहिलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी राहणार नाही. मात्र, सकस, हलका आहार घेणे आवश्यक आहे. मनात सकारात्क विचार राहतील असे प्रयत्न करा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. मित्रांच्या भेटी घ्या. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

वृषभ - आर्थिक लाभ होईल. मात्र जेवढे पैसे मिळतील तेवढेच खर्च पण होतील. प्रवासात दगदग होईल. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. सामानाची चोरी, अनोखळी लोकांशी वाद अशा अडचणी येऊ शकतात. महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. तब्येत सांभाळा. भेटवस्तू मिळतील. क्रोधाला आवार घातला पाहिजे. महिलांनी कौटुंबिक वादात कुणाचा अपमान होईल असे बोलू नये. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मिथुन - घरी पाहुणे येतील. त्यांची आव भगत करण्यात बरात वेळ व उर्जा खर्च होईल. मात्र, त्यातून मनावरचा ताण निघून जाईल हे पण महत्त्वाचे. सहकाऱ्यांना सांभाळून घ्यावे लागेल. हितशत्रू त्रस्त करतील. लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्याला गोडवा राहील. अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींची बदली होऊ शकते. व्यवसायात भरभराट होईल. काहींना प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क - भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचा योग येईल. प्रसिद्धी मिळेल. काही लोक तुमचे कौतुक करतील, तर काही लोक राग राग करतील. विविध कामात यश मिळेल. महत्त्वाचे निरोप येतील. व्यवसायात तुमचे निर्णय योग्य ठरतील. नोकरीत एखादी तडकाफडकी मनाविरुद्ध घटना घडेल. सामाजिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांची नाराजी राहील. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

सिंह - उत्साहवर्धक वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. नवीन संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत थोडे रागावर नियंत्रण ठेवा. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करा. भेटवस्तू मिळतील. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या - अनुकूल घटना घडतील. जीनवसाथीची साथ राहील. भाग्याची साथ राहील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनासारखे यश मिळेल. कामात उत्साह राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामे कराल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मात्र पोटाचा विचार करूनच खाणे-पिणे ठेवा. उगीचच आडवा हात मारू नका. घरी पाहुणे येतील. त्यांच्याशी गप्पागोष्टी रंगतील. टीप - रविवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ - घरात आनंदी वातावरण राहील. मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. त्यात तुमचा पुढाकार राहील. त्यासाठी धावपळ करावी लागेल. मनात उत्साह राहील. नोकरीत अनुकूल परिस्थीती राहील. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. आर्थिक आवक मनासारखी राहील. खरेदी करण्याकडे कल राहील. घरी आल्या-गेल्याची वर्दळ राहील. तब्येतीची काळजी घ्या. खाणे-पिणे सांभाळा. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीशी  मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. धाडसी निर्णय घेतले जातील. दीर्घकालीन गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे विविध कामे मार्गी लागतील. थोडा क्रोधाला आवर घातला पाहिजे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. मुलांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. टीप - रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

धनू- आर्थिक आवक मनासारखी राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. तरूण वर्गाला प्रेमात यश मिळेल. नोकरीत तुमचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल. उच्च पद प्रात्प होईल. महत्त्वाचे काम मिळेल. कामाचा ताण वाढेल. घरी लोकांचा राबता राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. मुलांना अनपेक्षित संधी मिळेल. त्यांचे सर्व सर्वत्र कौतुक होईल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

मकर - नोकरीत चांगली परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आ बैल मुझे वार अशा पद्धतीने व्यवहार करू नका. मुलांच्या अडचणी समजून घ्या. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. व्यवहार जपून करा. उसने पैसे विचार करून द्या. कुणाला जामीन राहू नका. कायद्याची बंधने पाळा. कुणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

कुंभ - आर्थिक बाजू चांगली राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. आवडत्या व्यक्तींना भेटता येईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांशी गैरसमजातून वाद होतील. प्रवासात काळजी घ्या. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. मुले आपल्या विश्वात मग्न असतील. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन -  नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. पगारवाढ मिळण्यास हरकत नाही. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला कामी येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मालमत्तेचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी बराच वेळ जाईल. मनात आनंदी विचार राहतील. प्रवासात दगदग होऊ शकते. भावंडांची काळजी वाटेल. लहान भावंडांना योग्य मार्गदर्शन करा. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

- विजय देशपांडे  (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष