ंअखंड हरिनाम सप्ताह व भागवत ज्ञानयज्ञ
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
माळाकोळी : श्रीक्षेत्र माळाकोळी येथे प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी येथे १३ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व भागवत पारायण ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरूवात झाली. अनेक नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार आहेत. चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञानासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाराज्योतिर्लिंग देवस्थान कमिटी व गावकर्यांकडून करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिनी १७ फेब्रुवारीला नंदीची भव्य मिरवणूक व १९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी परमेश्वराची रथाची भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ंअखंड हरिनाम सप्ताह व भागवत ज्ञानयज्ञ
म ळाकोळी : श्रीक्षेत्र माळाकोळी येथे प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी येथे १३ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व भागवत पारायण ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरूवात झाली. अनेक नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार आहेत. चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञानासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाराज्योतिर्लिंग देवस्थान कमिटी व गावकर्यांकडून करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिनी १७ फेब्रुवारीला नंदीची भव्य मिरवणूक व १९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी परमेश्वराची रथाची भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी संचालकांच्या चौकशीचे आदेशकिनवट : राज्याचे कृषी संचालक सुरेश आंबुलगेकर भ्रष्टमार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निवेदन राज्यपालांचे सचिवाच्या किनवट दौर्यात माजी आ. भीमराव केराम यांनी दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी माजी आ. भीमराव केरामांना दिले आहेत.चौकशीच्या काळात कृषी संचालक अंबुलगेकर यांनी भ्रष्ट मार्गाने नांदेड, मुंबई, पुणे, किनवट, भोकर, पाळज यासह विविध शहरात जमिन प्लॉट, घरे आदि स्वरूपात जवळपास १०० कोटी पेक्षा अधिकची मालमत्ता जमा केली, असा आरोप आहे.अंबुलगेकर कुटुंबियांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे संपत्तीचा उलञलेख प्रस्तुत निवेदनात माजी आ. भीमराव केराम यांनी केला होता. या तक्रार अर्जाची दखल राज्यपालांनी घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे माजी आ. भीमराव केराम यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)