नांदेड-बिकानेरसाठी साप्ताहिक गाडी
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:41+5:302015-02-15T22:36:41+5:30
नांदेड: रेल्वे बजेट - २०१४ मध्ये घोषित केल्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग हुजूर साहिब नांदेड - बिकानेर-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (साप्ताहिक) सुरू करणार आहे़

नांदेड-बिकानेरसाठी साप्ताहिक गाडी
न ंदेड: रेल्वे बजेट - २०१४ मध्ये घोषित केल्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग हुजूर साहिब नांदेड - बिकानेर-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (साप्ताहिक) सुरू करणार आहे़ श्री हुजूर साहिब नांदेड - बिकानेर एक्स्प्रेस (साप्ताहिक) गाडीचे उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे विशिष्ट गाडीला विडीओ रिमोट लिंकद्वारे नवी दिल्ली येथून १९ फेब्रुवारी रोजी हिरवी झेंडी दाखवणार आहेत़ या कार्यक्रमासाठी गुरूवारी नांदेड रेल्वेस्थानक येथे माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांची उपस्थिती राहणार आहे़ उद्घाटनासाठी विशिष्ट गाडीगाडी क्रमांक- ०७६२३ हुजूर साहिब नांदेड- बिकानेर गाडी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथून निघेल आणि अकोला, अहमदाबाद मार्गे बिकानेर येथे २० फेब्रुवारी रोजी रात्री ८़०५ वाजता पोहोचेल़ गाडी क्रमांक- १७६२३, १७६२४ हुजूर साहिब नांदेड-बिकानेर-हुजूर साहिब नांदेड नियमितपणे म्हणजेच दर गुरूवारी नांदेड येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि शुक्रवारी रात्री ८ वाजता पोहोचेल़ परतीच्या प्रवासात ही गाडी क्रमांक- १७६२४ बिकानेर येथून दर शनिवारी दुपारी ३़४० वाजता सुटेल आणि दर सोमवारी सकाळी ३़४५ वाजता पोहोचेल़ या गाडीस एकूण १७ डब्बे असतील़ ज्यात ०१ द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, २ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ द्वितीय श्रेणी शय्या, ६ सामान्य श्रेणी आणि २ एसएलआर असे एकूण १७ डब्बे असतील़