शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Weather Updates: कडाक्याच्या थंडीत देशातील 'या' भागांत बरसणार पाऊस, हवामान खात्यानं जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:29 IST

देशातील या राज्यांत दाट धुक्यासह पडणार कडाक्याची थंडी...

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. पहाडी भागांत बर्फवृष्टी सुरूच आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांत बुधवारपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच इतर किनारपट्टी भागांतही मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच, येत्या काही दिवसांत तिरुवल्लूर जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाजही आयएमडी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. 

शहराच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर चेन्नईचा पारा घसरला असून किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. हे तापमाण सरासरी 29.3 अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी आहे. चेन्नईचे हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक बालचंद्रन म्हणाले, उत्तर किनारी प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मंगळवारीही राज्यातील अनेक भागांत हलका पाऊस पडेल. राज्यात खालच्या पातळीवरील पूर्वेकडील वारे आणि वरच्या पातळीवरील पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे पाऊस सुरू झाला आहे, असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे. 

देशातील या राज्यात पावसाची शक्यता - याशिवाय, 17 जानेवारीपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांत पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये पावसाची शक्यता आहे. याच बरोबर, रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्येही पुढील 4-5 दिवसांत पाऊस होऊ शकतो. IMD ने ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांतही पावसाचा इशारा दिला आहे.

देशातील या राज्यांत दाट धुक्यासह पडणार कडाक्याची थंडी -येत्या दोन दिवसांत दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय, येत्या काही दिवसांत दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidarbhaविदर्भweatherहवामान