शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
3
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
4
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
5
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
6
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
7
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
8
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
9
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
10
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
11
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
12
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
13
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
14
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
15
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
16
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
17
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
19
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
20
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:59 IST

ओम प्रकाश राजभर लखनौ येथील निषाद पार्टीच्या संकल्प दिवस कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

लखनौ - सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या विधानाने राज्यात खळबळ माजली आहे. आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या ओम प्रकाश राजभर यांनी विना परवाना शस्त्र वाटणार असं म्हटलं आहे. इतकेच नाही तर त्यांनी त्याची तारीख आणि जागाही सांगितली आहे. ज्यालाही विना परवाना शस्त्रे हवीत त्याने १८ जानेवारीला आझमगडला येऊन घेऊ शकता असंही त्यांनी सांगितले आहे. एका मंत्र्‍याने अशा प्रकारे विधान केल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

ओम प्रकाश राजभर लखनौ येथील निषाद पार्टीच्या संकल्प दिवस कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. निषाद पार्टीच्या १३ व्या वर्धापनदिनी आयोजित या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे विधान केले. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संजय निषाद यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मच्छिमार समाज कुणाचीही व्होट बँक नाही. हा समाज केवळ नदी आणि तलावात मासेमारी करत नाही तर सरकार बनवणे आणि पाडणे हेदेखील जाणतो असं त्यांनी सांगितले.

तर ओम प्रकाश राजभर यांनी नवीन राष्ट्रीय सुहलदेव सेना म्हणजे आरएसएसची स्थापना केली आहे. येत्या १८ जानेवारीला त्यांच्या कमांडरांना विना परवाना शस्त्रे वाटू असं त्यांनी एका मुलाखतीत पुनरुच्चार केला. आमचा राजभर समाज लढाऊ वृत्तीचा आहे. या समाजाचा इतिहास संघर्षाचा आणि परदेशी आक्रमणाविरोधात लढण्याचा राहिला आहे. भारतात जे राहतात त्यांना वंदे मातरम बोललेच पाहिजे. भारतात जे खातात त्यांनी भारताची भाषा बोलली पाहिजे. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास आमची सेना एके ४७ सारख्या शस्त्राने सज्ज होऊन पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डरवरही लढेल असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, ओम प्रकाश राजभर हे कायम त्यांच्या विधानांमुळे वादात सापडतात. आता त्यांच्या नवीन विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे मात्र सत्ताधारी पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : UP Minister's Shocking Offer: Distributing Weapons Without License!

Web Summary : UP Minister Om Prakash Rajbhar sparked controversy by declaring he would distribute weapons without a license in Azamgarh on January 18th. He justified it by saying his community is historically combative and ready to defend India.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ