शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

संपत्ती कार्डामुळे गरिबी दूर होणार, पंतप्रधानांना विश्वास,  आर्थिक उलाढालीस चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:22 IST

शनिवारी ६५ लाख कार्डांचे वितरण करण्यात आल्याने गावांमधील जवळपास २.२४ कोटी लाभार्थ्यांकडे स्वामित्व संपत्ती कार्ड असेल.

नवी दिल्ली : स्वामित्व संपत्ती कार्डमुळे केवळ आर्थिक उलाढालीला चालना मिळणार नसून गरिबी निर्मूलनासाठी मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या हस्ते शनिवारी ६५ लाख स्वामित्व कार्डचे वाटप करण्यात आले. स्वामित्व संपत्ती कार्डमुळे कर्जासोबत सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार असल्याचे लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी स्पष्ट केले.

शनिवारी ६५ लाख कार्डांचे वितरण करण्यात आल्याने गावांमधील जवळपास २.२४ कोटी लाभार्थ्यांकडे स्वामित्व संपत्ती कार्ड असेल. संपत्तीचा अधिकार हा जगभर एक आव्हान असल्याचे स्पष्ट करत मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालाचा हवाला दिला. 

पंतप्रधान म्हणाले की, अनेक देशांत लोकांकडे संपत्तीच्या अधिकारासाठी कायदेशीर दस्तऐवज नाहीत. गरिबी निर्मूलनासाठी हा अधिकार महत्त्वाचा असल्याचे यात म्हटले आहे. गावातील संपत्ती हे मृत भांडवल असल्याचे एका अर्थतज्ज्ञाने म्हटले कारण, या संपत्तीचा काही उपयोग करत नाहीत. 

बँका देत नव्हत्या कर्जआजही आपल्या गावांतील हजारो लोकांकडे लाखो-कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, त्यांच्याकडे त्या संपत्तीचे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे वाद होत होते. संपत्ती बळकावली जात होती. बँका कर्ज देत नव्हत्या.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अगोदरच्या सरकारने काहाही केले नसल्याचे नमूद करत मोदींनी अप्रत्यक्षरीत्या पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. संपत्तीचा कायदेशीर अधिकार मिळाल्याने लाखो लोकांना कर्ज घेता आले.या पैशाच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. स्वामित्व कार्ड मिळालेल्यांमध्ये काही शेतकरी असून त्यांच्यासाठी हे कार्ड आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचा दावा मोदींनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी