शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुत्सद्दीपणे पाकिस्तानशी संपर्कात राहायला आवडेल; परराष्ट्र मंत्रालयाने मांडली बाजू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 18:11 IST

दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे. 

ठळक मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांनी  कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला होता.

नवी दिल्ली - भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं झटका दिल्यानंतर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला होता. गेल्या आठवड्यात भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांनी  कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला होता. मात्र, आज पाकिस्तानने पुन्हा  काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास नकार दिल्याने भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला मुत्सद्दीपणे वेगवेगळ्या माध्यमांतून पाकिस्तानच्या संपर्कात राहायला आवडेल सांगितले.  पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं आज साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला जाणार नाही, अशी माहिती दिली. 2 सप्टेंबरला जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यात आला होता. त्यावेळी राजदूत गौरव अहलुवालिया यांनी अज्ञात स्थळी जाधव यांची भेट घेतली होती. एका तुरुंगात ही भेट झाली. निश्चित वेळेच्या एक तासानंतर पाकिस्ताननं जाधव यांना अहलुवालिया यांना भेटू दिलं. ही भेट परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात होईल, असं पाकिस्ताननं आधी सांगितलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी पाकिस्ताननं भेटीचं ठिकाण बदललं. भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवCourtन्यायालयNew Delhiनवी दिल्लीPakistanपाकिस्तान