शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

शेतकऱ्यांनो, तुमच्या आडवी असलेली भिंत हटवतोय; पंतप्रधान मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 12:38 IST

PM Narendra Modi in FICCI AGM: पीएम-वाणी योजनेद्वारे सार्वजनिक वायफाय हॉटस्‍पॉटचे जाळे तयार होईल. गावागावात कनेक्टिव्हीटीचा व्यापक विस्तार होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या ९३ व्या जनरल बैठकीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सध्या ज्वलंत बनलेल्या कृषी कायदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना अडचणीची ठरणारे सर्व अडथळे, भिंती आम्ही हटवत आहोत, असे मोदी म्हणाले. 

कृषी क्षेत्राशी जोडलेले उद्योगधंदे जसे की एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर, फूड प्रोसेसिंग, स्टोरेज, कोल्ड चेन यामध्ये आम्ही मोठमोठ्या भिंती पाहिल्या आहेत. आता या भिंती हटविल्या जात आहेत. सर्व अडचणी दूर केल्या जात आहेत. या बदलांनंतर शेतकऱ्यांना नवीन बाजार मिळणार आहेत. नवीन पर्याय मिळणार आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होईल. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक होईल. याचा फायदा माझ्या देशातील शेतकऱ्यांना होईल असे मोदी म्हणाले. 

पीएम-वाणी योजनेद्वारे सार्वजनिक वायफाय हॉटस्‍पॉटचे जाळे तयार होईल. गावागावात कनेक्टिव्हीटीचा व्यापक विस्तार होईल. माझे तुम्हाला आवाहन आहे की तुम्ही ग्रामीण आणि निम-शहरी भागातील क्षेत्रात चांगल्या कनेक्टिव्हीटीच्या प्रयत्नांचे भागीदार व्हा. २१ व्या शतकात भारताच्या विकासाला गाव आणि छोटी शहरेच मदत करणार आहेत, असा मला विश्वास वाटतो असेही मोदी म्हणाले.

देशात कृषी क्षेत्राला मजबूत बनविण्यासाठी गेल्या काही वर्षांच वेगाने काम केले आहे. यामुळे भारतातील कृषी क्षेत्र आधीपेक्षा अधिक व्हायब्रंट झाले आहे. आज शेतकऱ्यांसमोर त्यांचे उत्पादन मंडईच्या बाहेर विकण्याचा पर्याय आहे. मंडईंचे आधुनिकीकरण होत आहे. शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्पादन विकण्याचा, खरेदी करण्याचा पर्याय मिळाला आहे. हे सारे फक्त शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच करण्यात आले आहे. जेव्हा देशाचा शेतकरी समृद्ध होईल तेव्हा देशही समृद्ध होईल असेही मोदी यांनी सांगितले. 

गेल्या ६ वर्षांत भारताने असे सरकार पाहिले आहे जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासियांच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे. प्रत्येक स्तरावरील देशवासियाला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही एकत्र येऊन काम केले आहे. नीती बनविली, निर्णय घेतले, परिस्थिती सांभाळली आहे. यामुळे सारे जग चकित झाले आहे, असेही मोदींनी या बैठकीमध्ये सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप