दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:53 IST2025-02-03T17:52:46+5:302025-02-03T17:53:17+5:30

Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. 

We will get 55 seats in Delhi, if women push...; Arvind Kejriwal's big prediction on Delhi Election 2025 | दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

दिल्लीत प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. जुन्या प्रचाराप्रमाणे आता कंदील प्रचार सुरु होणार आहे. दिल्ली निवडणुकीत लोकांचा कल कोणाकडे आहे, याबाबतचा सीव्होटरचा अंदाज समोर आला आहे. यात फारसा फरक दिसत नाहीय. असे असताना भाजपा दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी उत्सुक आहे, तर आपला किल्ला टिकवायचा आहे. आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. 

यावेळी माझ्या अंदाजानुसार दिल्लीत ५५ जागा मिळत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. परंतू जर माता - भगिनींनी जोराचा धक्का दिला तर त्या ६० वरही जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले. सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. 

नवी दिल्ली, जंगपुरा, कालकाजी या आपच्या तीन जागा फसल्या आहेत, असा भाजपा दावा करत आहे. परंतू हे लक्षात ठेवा की आप या जागा ऐतिहासिक फरकाने जिंकणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. निवडणुकीतील गैरप्रकार रेकॉर्ड करण्यासाठी झोपडपट्टी भागात स्पाय कॅमेरे आणि बॉडी कॅमेरे वाटले आहेत. भाजपाचे लोक आणि गुंडांची दुष्कृत्ये रोखण्यासाठी हे केले आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हे लोक ३-४ हजार रुपये देऊन त्यांच्या बोटांवर शाई लावणार आहेत. मतदारांनी ही शाई लावून घेऊ नये असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. 

सी व्होटरचा अंदाज काय?
"आपली, सरकार बदलण्याची इच्छा आहे का?" असा प्रश्न सी व्होटरने दिल्लीतील मतदारांना विचारला असता. 1 फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार, या प्रश्नावर उत्तर देताना, विद्यमान सराकारच्या कामावर आपण नाराज आहोत आणि यावेळी बदलाची इच्छा असल्याचे 43.9 टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, 10.9 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते नाराज आहेत, पण सरकार बदलण्याची इच्छा नाही. तसेच, 38.3 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाही यामुळे बदलही करू इच्छित नाही.


 

Web Title: We will get 55 seats in Delhi, if women push...; Arvind Kejriwal's big prediction on Delhi Election 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.