'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 20:18 IST2025-11-03T20:17:37+5:302025-11-03T20:18:45+5:30
Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला.

'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
Bihar Vidhan Sabha Election: बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असून, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना लक्ष्य करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीच्या नेत्यांना 'पप्पू, टप्पू आणि अप्पू' डिवचले. त्यावरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पलटवार केला. आम्हाला बिहारला गप्पू आणि चप्पूपासून वाचवायचे आहे, असे यादव म्हणाले.
दरंभगामध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीच्या नेत्यांना तीन माकड म्हणत टीका केली. राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांना पप्पू, टप्पू आणि अप्पू असे म्हणत योगींनी निशाणा साधला.
जे लोक आरसा बघून येतात, त्यांना...
योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेला अखिलेश यादव यांनी उत्तर दिले. अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "जे लोग आरसा बघून येतात, त्यांना सगळीकडे माकडेच दिसतात. माकडांच्या टोळीत बसवले तर वेगळे दिसत नाहीत."
सिवानमध्ये झालेल्या प्रचारसभेतही अखिलेश यादव यांनी भाजप नेत्यावर हल्ला चढवला साधला. "आम्हाला बिहारला गप्पू आणि चप्पूपासून वाचवायचे आहे. एनडीएला बिहार तारण ठेवायचे आहे. ते घाबरलेले आहेत. तेजस्वी यादव यांच्या नोकऱ्या देण्याच्या आणि महिलांना २५०० सन्मान निधी देण्याच्या घोषणेमुळे ते चिंताग्रस्त आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.
भाजपला त्यांच्या अपयशांवर चर्चा नकोय
"भाजप गप्पू प्रकरण आहे. भाजपने चंद्रावर जमीन देण्याचा, बँकेत १५ लाख जमा करण्याचा आणि कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याचे वचन दिले होते. हे तेच लोक आहेत, ज्यांना अमेरिकेने घाव घातला आहे. अमेरिका त्यांना घाबरवत आहे.. त्यामुळे ते अशा प्रकरच्या मार्गाचा वापर करत आहेत की, जेणेकरून विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अपयशांची चर्चा होऊ नये. भाजपकडे गप्पू आणि चप्पू आहे आणि बिहारची जनता यावेळी समता निवडेल", असे योगी आदित्यनाथ म्हणाले.