शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

By मोरेश्वर येरम | Updated: March 16, 2023 13:39 IST

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना आज याचिकेच्या रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे.

नवी दिल्ली-

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना आज याचिकेच्या रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. यात कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू आणखी भक्कम करण्यासाठी जोरदार युक्तिवाद करत आहेत. यात सिब्बल यांनी कोर्टासमोर आपली रोखठोक भूमिका मांडताना कोर्टरुमबाहेर जनमानसात काय प्रतिमा निर्माण झालीय याचाही आधार घेत युक्तिवाद केला. 

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

"मला आता अधिक काही सांगण्याची गरज नाही. माझा राजकीय अनुभव आणि तुमचा न्यायिक अनुभव हे प्रकरण समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. आपलं महत्व कमी झालंय. आता आपली बाहेर थट्टा होते. लोकांचा आता आपल्यावर विश्वास उरलेला नाही", असं रोखठोक मत कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांसमोर व्यक्त केलं आहे. राज्यपाल असो किंवा मग हे न्यायालय...विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात कुणीच हस्तक्षेप करू शकत नाही. अध्यक्षांचे अधिकार अबाधित राहिलेच पाहिजेत, असंही ते पुढे म्हणाले. 

कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात राज्यपालांच्या भूमिकेवरच जोरदार आक्षेप नोंदवला. बहुमत चाचणी केवळ युतीच्या जोरावर बोलावली गेली पाहिजे होती. पण इथं राज्यपालांनी पक्षातील मतभेदाच्या आधारावर बहुमत चाचणी बोलावली. त्यांनीच पक्षाचा नेता कोण हे ठरवून टाकलं, हे म्हणजे असं झालं की निवडणूक आयोगाकडे ज्या राजकीय पक्षाची नोंदणी आहे आणि सर्वांनी मिळून आपला नेता कोण हे निवडणूक आयोगालाही सांगितलेलं आहे. तरीही राज्यपालांनी निवडणूक आयोगात नमूद असलेल्या पक्षाच्या नेत्याला महत्व दिलं नाही. त्यांनी दुसराच नेता पक्षाचा नेता म्हणून मान्य केला, असं सिब्बल म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर केला घणाघातकपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. "विश्वासघात केला म्हणून त्यांना आज मुख्यमंत्रीपद मिळालं. संविधानाच्या बाहेर, घटनात्मक कायद्याच्या तत्त्वांच्या बाहेर राहून विधिमंडळ पक्षातील एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि तेही निवडणूक आयोगाकडे न जाता, नोंदणी न करता- असा कोणता राजकीय पक्ष असतो?", असं कपिल सिब्बल म्हणाले.

“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

तुम्ही म्हणता की मीच नेता आहे. कोणत्या धर्तीवर तुम्ही असा दावा करता? तुम्हाला २२ जून रोजी पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. मग तुम्ही नेते कसे? त्यांनी काल युक्तिवाद केला की विधीमंडळाच्या बाहेर व्हिप कसा लागू होऊ शकतो? मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपच्या कुशीत बसला होता आणि एका राजकीय पक्षाने दिलेला व्हिप मोडलात, असं जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे