शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 8:08 PM

कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

नवी दिल्ली  - कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विभाजनाच्या प्रश्नावर चीनने नाक खूपसत हे विभाजन अवैध आणि निरर्थक असल्याचा म्हटले होते. त्यानंतर भारतानेहीचीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घेतली पाहिजे, असा टोला भारताने चीनला लगावला आहे. भारताने जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतला होता. जम्मू-काश्मीरचे विभाजन हे अवैध आणि निरर्थक आहे. भारताने चीनच्या काही भागाला आपल्या प्रशासकीय अधिकार क्ष्रेत्रात सामील करून घेतले आहे. ही बाब म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान आहे, असे चीनने म्हटले होते. दरम्यान,  भारताने चीनच्या आक्षेपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घ्यावी, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिला आहे. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने नुकत्याच केलेल्या काश्मीर दौऱ्यावरही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यालाही परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील लोकांना निमंत्रित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाला अधिकार आहे. अनेकदा अशी मंडळी खासगी दौऱ्यावर येतात. काही वेळा राष्ट्रहीत विचारात घेऊन आम्ही त्यांना अधिकृतरीत्या औपचारिक दौऱ्याशी जोडून घेतो. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधींनी भारताला ओळखून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यात विविध विचारसरणीचे लोक होते. आम्ही त्यांना काश्मीरमध्ये जाण्यास पाठिंबाद दिला,'' असे रविश कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतchinaचीन