Watch: Uttarakhand BJP MLA does Tamanche Pe Disco, stirs row | 4-4 बंदुका घेऊन भाजपा आमदाराचा 'डिस्को डान्स', व्हिडीओ व्हायरल
4-4 बंदुका घेऊन भाजपा आमदाराचा 'डिस्को डान्स', व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोणत्या मारहाणीचा नाही, तर प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करताना दिसत आहेत.

प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या काही समर्थकांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी 'लांबा लांबा घूंघट काहे को डाला ...' या गाण्यावर प्रणव सिंह चॅम्पियन एका हातात दारुचे ग्लास आणि एका हातात 4-4 बंदुका घेऊन डान्स करत आहे. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे समजते. 


दरम्यान, प्रणव सिंह चॅम्पियन यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना प्रणव सिंह चॅम्पियन दिसून आले होते. याप्रकरणी पत्रकाराकडून दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात प्रणव सिंह चॅम्पियन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर जूनमध्ये तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. 
 


Web Title: Watch: Uttarakhand BJP MLA does Tamanche Pe Disco, stirs row
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.