VIDEO- थरारक! ...अन् वाहून गेलेल्या रस्त्यावर लोखंडी पाइप टाकून त्यानं चालवली गाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:55 PM2019-08-27T15:55:13+5:302019-08-27T15:55:28+5:30

गेल्या आठवड्याभरापासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे.

Watch: Car Crosses Road on Temporary Iron-Pole Bridge in Himachal Pradesh after Road Caves In | VIDEO- थरारक! ...अन् वाहून गेलेल्या रस्त्यावर लोखंडी पाइप टाकून त्यानं चालवली गाडी 

VIDEO- थरारक! ...अन् वाहून गेलेल्या रस्त्यावर लोखंडी पाइप टाकून त्यानं चालवली गाडी 

Next

शिमलाः गेल्या आठवड्याभरापासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते वाहून जाण्यासारखे प्रकार घडले आहेत. हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील ड्रेकरी भागात 22 ऑगस्ट रोजी रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ड्रेकरी या भागातला रस्ता मध्येच वाहून गेल्यानं मोठा खड्डा पडला असून, वाहन चालकांनीही त्याच रस्त्यावरून पलिकडे जाण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

काही वाहन चालकांनी वाहून गेलेल्या दोन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी लोखंडाचे पाईप टाकले असून, या लोखंडाच्या पाइपावरूनच कार दामटताना हे वाहन चालक दिसत आहेत. 28 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये वाहन चालक जीवाशी खेळ करून कशा प्रकारे वाहन लोखंडाच्या पाइपावरून पलिकडे नेत आहेत हे पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये चालक गाडी चालवत असून, एक जण त्याला गाडी त्या लोखंडी पाइपावरून नेण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसत आहे. गाडीची पार्किंग लाइट सुरू असून, वाहन चालक हळूहळू ती कार त्या पाइपावरून पलिकडे नेत आहे. हा व्हिडीओ एएनआयनं ट्विट केला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आम्ही या चित्तथरारक कसरतीनं अजिबात प्रभावित झालेलो नाही, खरं तर हा मूर्खपणा आहे, असं एका युजर्सनं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं आहे की, जुगाड करण्यासाठीही काही मर्यादा असतात, हा शुद्ध मूर्खपणा आहे. 

Web Title: Watch: Car Crosses Road on Temporary Iron-Pole Bridge in Himachal Pradesh after Road Caves In

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.