शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बुरखा घातलेल्या महिलेनं CRPF बंकरवर फेकला बॉम्ब, अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 2:40 PM

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb)  CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे.

श्रीनगर-

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb)  CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. सीआरपीएफच्या कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब फेकून महिला पळून गेली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातात बॉम्ब असल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरखा घातलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला लवकरच अटक करण्यात येईल. 

दरम्यान, पोलिसांनी नुकत्याच झालेल्या एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले, त्यापैकी एक पत्रकार होता पण नंतर तो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता. सोपोरमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली असून सदर ठिकाण बाजार परिसरातील आहे. येथे रस्त्याच्या एका बाजूला सीआरपीएफचं बंकर तयार करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पिशवीत काहीतरी घोळत असताना ती इकडे तिकडे पाहते आणि बॅगमधून एक संशयास्पद वस्तू बाहेर काढते. महिला ती वस्तू सीआरपीएफच्या बंकरच्या दिशेनं फेकते आणि या ठिकाणी आग लागल्याचं पाहायला मिळतं. महिलेनं पेट्रोल बॉम्ब फेकल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यानंतर तेथे गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागतात. काही लोक बादल्यांमध्ये पाणी भरून आग विझवताना दिसत आहेत. ही घटना घडत असताना रस्त्यावरून ये-जा करणारे अनेकजण दिसतात. अनेक मोटारसायकल आणि कारही रस्त्यावरून येताना दिसतात.

हातात स्फोट होणार होताइंडिया टुडेच्या वृत्तानुसार महिलेनं सीआरपीएफ बंकरवर फेकलेली वस्तू पेट्रोल बॉम्ब होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुरुवातीला बुरखा घातलेली महिला होती की पुरुष याबाबत शंका होती, पण बुधवारी सकाळी काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयला घटनेची माहिती दिली. "काल सोपोरमधील सीआरपीएफ बंकरवर बॉम्ब फेकणाऱ्या महिलेची ओळख पटली असून लवकरच तिला अटक करण्यात येईल", असं आयजी विजय कुमार यांनी सांगितलं आहे. सीसीटीव्हीत महिलेच्या हातातच बॉम्ब फुटता फुटता राहिला. तिनं बॉम्ब फेकून तेथून पळ काढला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद