शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

तीन हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या खेड्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक : पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 12:10 IST

२०२१ पासून सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी विघटनशील पिशवी द्यावी लागणार 

ठळक मुद्दे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम देशात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढला : विल्हेवाटीसाठी करावा लागेल प्रयत्न

पुणे : शैक्षणिक संस्था, हाउसिंग कॉलनी यांनी आपल्या परिसरातच कचरा जिरवला पाहिजे. नगर परिषद असलेल्या शहरांना कचरा व्यवस्थापनाची सक्ती आहे. परंतु, यापुढे ३००० पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक राहील, अशी घोषणा पर्यावरणमंत्रीप्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली.    आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, स्वच्छ संघटनेच्या संस्थापिका लक्ष्मीनारायण, वासंती जाधव, नगरसेविका हर्षदा जाधव, मोनिका मोहोळ यांच्यासह स्वच्छता सेविका उपस्थित होत्या.  जावडेकर यांनी यावेळी स्वच्छता सेविकांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी दिवाळी स्वच्छतासेविका आणि इतर सफाई कर्मचारी बरोबर साजरी करतो.  ज्यातून मला त्यांचे काम व प्रश्नांना समजून घेणे शक्य होते. सर्वांना कचरा शेडची गरज असते, परंतु कुणालाही ती आपल्या घराजवळ नको असते हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. देशात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढला असून त्याचबरोबर त्याच्या विल्हेवाटीसाठी अजून प्रयत्न करावा लागेल. सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिनबरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे; परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही. जानेवारी २०२१ पासून तो सर्वांना बंधनकारक राहील, असेही जावडेकर यांनी सांगितले.   कचºयाची विल्हेवाट ही विकेंद्रित पद्धतीने लावण्याची गरज आहे. कचºयाच्या वाहतुकीसाठी खर्च होणारा पैसा तो कचरा आसपासच्या परिसरातच जिरवण्यासाठी व त्यातून खतनिर्मितीसाठी वापरला गेला पाहिजे. तसेच टाकाऊ प्लॅस्टिक विकत घेणाºया कंपन्यांचे प्लांट जर पुण्यातच असतील तर ते खूप मदतीचे ठरेल, असे मत लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले. 

*   ५00 स्वच्छता सेविकांचे प्रतिनिधित्व करणाºया राणी शिवशरण म्हणाल्या, कचºयाच्या वर्गीकरणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र जागा मिळाल्यास स्वच्छता सेविकांना खूप फायद्याचे ठरेल. तसेच व्ही कलेक्टसारखे उपक्रम आम्हाला घरांमधील निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळवायला मदत करतात.

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPrakash Javadekarप्रकाश जावडेकरenvironmentपर्यावरण