CPI च्या कार्यालयातून खरंच AC काढून नेला का? कन्हैय्यानं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:14 AM2021-10-02T11:14:27+5:302021-10-02T11:15:30+5:30

काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कन्हैया कुमार याने पाटणामधील सीपीआयच्या कार्यालयामधील खोलीत असलेला एसी उतरवून नेला आहे. हा एसी कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी राहत असलेल्या खोलीत लावलेला होता. याबाबत पत्रकाराने कन्हैय्या प्रश्न विचारला होता.

Was the AC really removed from the CPI office of patana? Kanhaiyya gave the answer | CPI च्या कार्यालयातून खरंच AC काढून नेला का? कन्हैय्यानं दिलं उत्तर

CPI च्या कार्यालयातून खरंच AC काढून नेला का? कन्हैय्यानं दिलं उत्तर

Next
ठळक मुद्देआरोप फेटाळत कन्हैय्याने स्पष्टपणे उत्तर देण्याचं टाळलं. 'मिम्स मटेरियल हे मेनस्ट्रीम बनत आहे, हे मोठं दुर्भाग्य आहे. यामध्ये सत्यता काय असणार आहे, असे कन्हैय्याने म्हटले

नवी दिल्ली - नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारने भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपाला टोला लगावला आहे. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करणार असा इशारा कन्हैया कुमारने दिला आहे. तसेच, कन्हैय्याने सीपीएमचं कार्यालय सोडताना तेथील एसी काढून नेला होता, या प्रश्नावरही त्याने उत्तर दिलंय.

काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कन्हैया कुमार याने पाटणामधील सीपीआयच्या कार्यालयामधील खोलीत असलेला एसी उतरवून नेला आहे. हा एसी कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी राहत असलेल्या खोलीत लावलेला होता. याबाबत पत्रकाराने कन्हैय्या प्रश्न विचारला होता. त्यावर, आरोप फेटाळत कन्हैय्याने स्पष्टपणे उत्तर देण्याचं टाळलं. 'मिम्स मटेरियल हे मेनस्ट्रीम बनत आहे, हे मोठं दुर्भाग्य आहे. यामध्ये सत्यता काय असणार आहे, एसी घेऊन गेला, रिमोट सोडून गेला, भींतीमधील गटार राहून गेली, त्याला सिमेंटने नाही भरंल. चप्पल घेऊन गेला. गटार साफच नाही केली असे आरोप लावतात, हे राजकीय आरोप नाहीत. राजकीय व्यक्तीवर राजकीयच आरोप लागले पाहिजे,' असे म्हणत कन्हैय्या एकप्रकारे स्पष्टपणे या प्रश्नाचे उत्तर देणे टाळल्याचे दिसून आले. 

काय म्हणाले ऑफिस इन्चार्ज

पाटण्यातील सीपीआयचे ऑफिस इन्चार्ज इंदुभूषण वर्मा यांनी सांगितले की, त्या खोलीमध्ये त्यांचा माणूस राहत होता. दोन महिन्यांपूर्वी तो एसी काढून घेऊन गेला. तर सीपीआयचे नेते विजय मिश्रा यांनी सांगितले की, कन्हैया कुमार याने एसी घेऊन जाण्यासाठी पार्टीकडे परवानगी मागितली होती. तेव्हा पक्षाने सांगितले की, ही तुमची संपत्ती आहे. तुम्ही ती घेऊन जाऊ शकता. तिथे कन्हैयाचा एक माणूस राहायचा. दोन महिन्यापूर्वी त्याने दुसरीकडे घर घेतले. तेव्हा खोलीत काही सामान होते, ते तो घेऊन गेला. आताही खोलील काही सामान आहे. मात्र, काही हरकत नाही. कन्हैया कुमारने पक्षासाठी खूप काही केले आहे, असे वर्मा यांनी म्हटलं.  

दरम्यान, दिल्लीतील जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय येथून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी त्याचा दारुण पराभव केला होता. गेल्या काही काळापासून त्याचे सीपीआयमधील संबंध बिघडले होते. अखेरीस त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
 

Read in English

Web Title: Was the AC really removed from the CPI office of patana? Kanhaiyya gave the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.