शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नाही, रक्तपात रोखण्यासाठी चर्चा करू या- मेहबुबा मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 4:44 PM

सुंजवानमधल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधल्या करणनगरमधल्या सीआरपीएफ हेडक्वॉर्टरवर हल्ला केला आहे.

जम्मू-काश्मीर- सुंजवानमधल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधल्या करणनगरमधल्या सीआरपीएफ हेडक्वॉर्टरवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यांत लष्कराच्या जवानांबरोबरच स्थानिकांनाही हकनाक प्राण गमवावे लागत आहेत.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानबरोबर युद्ध हा पर्याय नाही, असं म्हटलं आहे. काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चेशिवाय पर्याय नाही. रक्तपात रोखण्यासाठी ते गरजेचं आहे. मला माहीत आहे की, टीव्ही न्यूज चॅनेलच्या अँकरकडून मला देशद्रोही ठरवलं जाईल. मला याचा काही फरक पडत नाही. जम्मू-काश्मीरची माणसे त्रास सहन करतायत. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल. युद्धा हा काही पर्याय असू शकत नाही, असं मेहबुबा मुफ्ती ट्विटर अकाऊंटवरून म्हणाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानशी युद्धाशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. सीमेवर पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैनिक शहीद होत आहेत. कधीपर्यंत सैनिकांना शहीद होऊ द्यायचे. चर्चा खूप झाली, भाषणही नको आता थेट पाकिस्तानशी युद्ध करा. मिसाईल, टँकचा वापर करून हल्ला करा'', असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे केले होते.  

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीBJPभाजपा