शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळातच वक्फ अहवाल संसदेत; आमच्या आक्षेपांची दखलच घेतली नसल्याचा विरोधकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:46 IST

विरोधकांचा सभात्याग, थोड्या वेळाने परतले, यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

नवी दिल्ली : विरोधकांच्या गदारोळातच वक्फ संशोधन विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आला. जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी लोकसभेच्या पटलावर अहवाल ठेवला. तत्पूर्वी राज्यसभेत हा अहवाल ठेवण्यात आला. विरोधकांनी अहवालावर आक्षेप नोंदवत गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित झाले.

वक्फ अहवालात आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांचा समावेश केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा अहवाल मांडत असताना विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, काही वेळानंतर विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात परतले. लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे मुद्दे अहवालात जोडण्याची विनंती लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना केली. विरोधकाच्या मुद्द्यांवर भाजपचा कुठलाही आक्षेप नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर बिर्लांनी काही विरोधी पक्षांच्या सदस्यांचे मुद्दे अहवालासोबत जोडले असल्याचे लोकसभेत सांगितले. मात्र, जेपीसी अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

काय आहे जेपीसी अहवालात?हा अहवाल कोणत्याही एका विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही. किंबहुना, त्यात अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी उत्तमरीतीने निर्णय घेण्याचे सुचवले आहे. अल्पसंख्याक समाजातील बांधव मोठ्या श्रद्धेने आपल्या जमिनी वक्फला दान करतात. याचा लाभ शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून गरीब अल्पसंख्याकांना कसा होईल, याचा विचार केला आहे. 

काही धनदांडग्यांनी दान केलेल्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप हा अहवाल राज्यसभेच्या पटलावर ठेवताना मेधा कुलकर्णी यांनी केला. या विधेयकामुळे त्यांच्या जमिनी हातच्या जाणार असल्याने विरोध होत आहे. संयुक्त संसदीय समितीने गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक राज्यातील अनेक घटकांशी संवाद साधून हा अहवाल तयार केला आहे, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

खोटा अहवाल असल्याचा खरगेंचा आरोपवक्फ संशोधन विधेयकासाठी स्थापन केलेल्या जेपीसीत विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदवले होते. मात्र, ते काढून टाकण्यात आल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. केवळ बहुमत असलेल्या सदस्यांची मते विचारात घेणे योग्य नाही. हा सर्व प्रकार लोकशाही व नियमांविरोधात असल्याचे नमूद करत पटलावर अहवाल खोटा असल्याचा दावा खरगे यांनी केला.

टॅग्स :Parliamentसंसद