मुस्लिमांमध्ये फूट कोणी पाडली? कोण म्हणतेय अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत; रिजिजूंनी एकेकाचे उत्तर दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:14 IST2025-04-03T00:14:13+5:302025-04-03T00:14:44+5:30
Waqf Amendment Bill news: अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बिलापूर्वीच्या सदस्यांच्या भाषणावर केला आहे. तसेच हे लोक देशाविरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे.

मुस्लिमांमध्ये फूट कोणी पाडली? कोण म्हणतेय अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत; रिजिजूंनी एकेकाचे उत्तर दिले
वक्फ विधेयकावरून आम्ही मुस्लिमांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप होत आहे, अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत असे सांगत आहेत. मी म्हणतो कोण म्हणतोय की अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, मी अल्पसंख्यांक आहे. देशातील सर्वात छोटा धर्म पारसी लोक आहेत, ख्रिश्चन शिकलेले नाहीत का, असा सवाल अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बिलापूर्वीच्या सदस्यांच्या भाषणावर केला आहे. तसेच हे लोक देशाविरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे.
तुम्ही वारंवार म्हणता की आमचे सरकार मुस्लिमांवर कारवाई करत आहे. तुम्ही वारंवार म्हणत आहात की मुस्लिमांमध्ये फूट पडत आहे. पण तुम्ही लोकांनीच सुन्नी, शिया आणि इतर मुस्लिमांचे बोर्ड वेगळे केले होते. आम्ही सर्व मुस्लिमांना एकत्र करत आहोत, तुम्हीच त्यांना वेगळे केले, असा आरोप रिजिजू यांनी केला.
अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत असे कोण म्हणाले? तुम्ही आमच्या सरकारविरुद्ध घोषणा देऊ शकता आणि असहमत होऊ शकता. पण ते कसे म्हणू शकतात की अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत? मी स्वतः अल्पसंख्याक आहे, अल्पसंख्याक भारताशिवाय इतरत्र सुरक्षित नाहीत. येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करू शकत नाहीत. तुम्ही देस विरोधी बोलत आहात असा आरोप रिजिजू यांनी केला.
क तुमचे कारनामे पाहत आहेत. तुम्ही म्हणता की देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. मी देखील अल्पसंख्याक आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध आहेत. तुम्ही पारशींसारख्या लहान अल्पसंख्याकांचा विचार केला नाही, मोदीजींनी त्यांच्यासाठी एक योजना सुरू केली. ते खासदारकीही जिंकू शकत नाही. ते नामशेष होऊ नयेत यासाठी एक योजना सुरू करण्यात आली. त्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाचे स्वागत केले आहे, असे रिजिजू म्हणाले.