शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अथांग सागराचा अभ्यास करायचा आहे? मग ओशनोग्राफीचा पर्याय जरुर निवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:52 IST

समुद्राचा विविधांगी अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला ओशनोग्राफी असं म्हटलं जातं. भारतामध्ये ओशनोग्राफीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल ओशनोग्राफी इन्स्टीट्यूट ही संस्था कार्यरत आहे.

ठळक मुद्देओशनोग्राफीमध्ये जैवसंस्थेतील बदल, भूविवर्तनिय हालचाली, सागरतळाची रचना, जिओफिजिकल फ्लूइड डायनामिक्स, सागरी जीव, महासागरांतील प्रवाह यांच्याबद्दल शिक्षण दिले जाते.

मुंबई- भारताला 7517 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला 720 किलोमिटर लांबीचा किनारा लाभला आहे. समुद्र जसा त्याच्या विस्तारामुळे अथांग आणि मोठा आहे तसे समुद्राच्या संबंधित करिअर करण्याच्या संधीही विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. समुद्राचा विविधांगी अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला ओशनोग्राफी असं म्हटलं जातं.भारतामध्ये ओशनोग्राफीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल ओशनोग्राफी इन्स्टीट्यूट ही संस्था कार्यरत आहे.  ओशनोग्राफीमध्ये विविध शैक्षणिक संस्था संशोधन व अभ्यासक्रम शिकवतात. ओशनोग्राफीमध्ये जैवसंस्थेतील बदल, भूविवर्तनिय हालचाली, सागरतळाची रचना, जिओफिजिकल फ्लूइड डायनामिक्स, सागरी जीव, महासागरांतील प्रवाह यांच्याबद्दल शिक्षण दिले जाते.

ओशनोग्राफी शिकवणाऱ्या संस्था-विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठ, चेन्नई येथील अण्णा विद्यापिठातील इन्स्टीट्यूट ऑफ ओशन मॅनेजमेंट, तामिळनाडूतील परनगिपेट्टाईमधील अण्णामलाई विद्यापिठातील सेंटर फॉर अॅडवान्स्ड स्टडी इन मरिन बायोलॉजी, रत्नागिरी येथील मरिन रिसर्च लॅबोरेटरी, तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापिठातील मरिन सायन्सेस डिपार्टमेंट, ओडिशामधील बरहामपूर विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्सेस, कॅलकटा विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्सेस, मुंबई विद्यापिठातील सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरिज एज्युकेशन,  कोचिन विद्यापिठातील स्कूल ऑफ मरिन सायन्सेस, गोवा विद्यापिठातील डिपार्टनेंट ऑफ मरिन सायन्सेस व डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोटेक्नॉलजी, आयआयटी दिल्लीमधील सेंटर फॉर अॅटमोस्फेरिक सायन्सेस, आयआयटी खरगपूर येथील डिपार्टमेंट ऑफ नावल आर्किटेक्चर,  आयआयटी मद्रास येथील ओशन इंजिनिअरिंग सेंटर, बंगळुरु येथील इनलँड फिशरिज युनिट, कारवार येथील कर्नाटक विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन बाय़ोलॉजी, केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील केरला अॅग्रीकल्चर विद्यापिठातील कॉलेज ऑफ फिशरिज, याशिवाय उत्कल विद्यापिठ ओडिशा, मंगळुरु विद्यापिठ, फिशरिज कॉलेज अँड रिसर्च इन्स्टीट्यूट तुतिकोरीन येथे ओशनोग्राफी संबंधित विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येईल.

ओशनोग्राफीतील संशोधन करण्यासाठी संस्था-

  • भाभा अॅटॉमिक रिसर्च इन्स्टीट्यूट- मुंबई, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टीट्यूट- लखनौ
  • सेंट्रल इलेक्ट्रो- केमिकल्स रिसर्ट इन्स्टीट्यूट- कराईकुडी, तामिळनाडू
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अॅक्वाकल्चर- चेन्नई,
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरी- बंगळुरु
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ ऑफ फिशरिज टेक्नोलजी- कोची,
  • सेट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टीट्यूट- कोची
  • सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टीट्यूट- मंगऴुरु
  • सेंटर फॉर मरिन लिविंग रिसोर्स अँड इकोलॉजी- काकानाड, कोची
  • सेंट्रल मेकॅनिकल रिसर्च इन्स्टीट्यूट- दुर्गापूर
  • सेंट्रल सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टीट्यूट- भावनगर, गुजरात
  • सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला-पुणे
  • सेंटर फॉर अर्थ सायन्सेस स्टडीज-तिरुवनंतपुरम
  • सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग अँड सिम्युलेशन- बंगळुरु
  • इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड ओशन टेक्नॉलजी- ओनजीसी नवी मुंबई
टॅग्स :Educationशिक्षणIndiaभारतCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन